‘तो’ शब्द वापरायला नको होता…, शिवराळ भाषेनंतर अजितदादांनी व्यक्त केली दिलगिरी

Ajit Pawar Aologized : राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून महायुतीमधील असो किंवा महाविकास आघाडीमधील

Ajit Pawar Aologized

Ajit Pawar Aologized

Ajit Pawar Aologized : राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून महायुतीमधील असो किंवा महाविकास आघाडीमधील घटक पक्ष जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी जोरदार प्रचार करताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षफुटीनंतर पहिल्यांदा होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार देखील जोरदार प्रचार करताना दिसत आहे. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथील एका प्रचार सभेत विकासावर बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडून शिवराळ भाषेचा उपयोग करण्यात आला होता मात्र आता अजित पवार यांनी वक्तव्य मागे घेत दिलगिरी व्यक्त केली आहे. त्या दिवशी मी एक चुकीचा शब्द वापरला मी तो शब्द वापरायला नको होता. त्याबद्दल मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो कारण आपल्याला या सगळ्यात पडण्यापेक्षा विकास साधायचा आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अकोला येथे आयोजित एका प्रचार सभेत बोलताना म्हटले आहे.

अकोला (Akola) येथे आयोजित या प्रचार सभेत बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, जिथे जिथे आमची सत्ता आली तिथे तिथे आम्ही विकास केला आहे. तसाच विकास आपल्याला इथे करायचा आहे. वेगवेगळ्या शहरांमध्ये एक बकालपणा आहे. मी त्या दिवशी एक चुकीचा शब्द वापरला. मी भिकार असा शब्द वापरायला नको होता. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु, शहरांध्ये बकालपणा नसला पाहिजे, या माझ्या भूमिकेवर मी ठाम आहे. आपण आपल्या शहरांचा विकास करु आणि बकालपणा हद्दपार करु असं अकोल्यातील प्रचार सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

आंबेजोगाईत नेमकं काय म्हणाले होते अजित पवार?

बीड जिल्ह्यातील आंबेजोगाईतील (Ambejogai) एका प्रचार सभेत बोलताना अजित पवार यांनी विरोधकांवर विकासावरुन जोरदार टीका करत म्हणाले होते की, प्रचाराला आल्यानंतर मी काहीही थातुरमातुर आश्वसनं देत नाही. आपण कुठेही काहीतरी थातूरमातूर सांगायचं अशी माझी भावना नाही. मी शब्दाचा पक्का आहे. मी माझ्या भागात ते करुन दाखवलं आहे. त्यामुळे आज आंबेजोगाईमध्ये येऊन सांगतोय. आपणही तसाच विकास करु. परंतु, काही पुढारी येतात आणि सागंतात की आपण असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. परंतु, त्यांची शहरं बघा, घाण, भिकारxx आणि बकाल शहरं असतात. तिथे सगळीकडे बकालपणा असतो असं आंबेजोगाईत बोलताना अजित पवार म्हणाले होते.

एका तासाचे किती घेणार? त्याने डायरेक्ट मॅसेज केला; रातोरात प्रकाशझोतात आलेल्या गिरीजा ओकचा धक्कादायक खुलासा

यानंतर अजित पवार यांच्यावर विरोधकांकडून चारही बाजूने जोरदार टीका करण्यात येत होती मात्र आता अकोल्यातील एका सभेत बोलताना अजित पवार यांनी वक्तव्य मागे घेत दिलगिरी व्यक्त केली आहे.

Exit mobile version