राज्यात हे सरकार आल्यापासून जेवढा जाहिरातीयावर खर्च झाला तेवढा खर्च आजवर कधी झाला नव्हता. अशी टीका अजित पवार यांनी आज केली. विरोधी पक्षनेते अजित पवार आज विधानसभेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या धोरणावर आक्रमकपणे टीका केली.
राज्य सरकारच्या धोरणावर टीका करताना ते म्हणाले की राज्यात आजवर अनेक सरकार आली, पण या सरकारकडून ९ महिन्यांत जाहीरातीवर एवढा खर्च केला आहे, तेवढा खर्च राज्याची निर्मिती झाल्यापासून कोणीही केला नाही. साऊथमध्ये जसे मोठमोठे असे २०-२० फुट बॅनर लावलात, तसं आपल्या राज्यात सुरू झाली आहे. सरकारने जाहिरातीने मुंबई व्यापून टाकली आहे.
Ajit Pawar : कृषिमंत्र्यांनी ‘तारे’ तोडायला नको होते, अवकाळीचा मुद्द्यावरून अजित पवार संतापले
पुणे महापालिकातील भ्रष्टाचाराची चौकशी करणार का ?
मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी सूर केली आहे. पण हेच मुख्यमंत्री पुणे महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करणार का ? असा सवाल अजित पवार यांनी विधानसभेत विचारला.
(बातमी अपडेट होत आहे)
https://www.youtube.com/watch?v=7EZp9IFrVIU
