Santosh Deshmukh Murder Case : बीड जिह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची निर्घृण हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना तातडीने अटक करून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी आज शनिवार (दि. 4 जानेवारी) रोजी परभणीत सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.
Suresh Dhas : छोटा आका कोण अन् मोठा आका कोण?, सुरेश धस यांनी पहिल्यांदाच घेतली थेट नावं
सकाळी 11 वाजता जिंतूर रस्त्यावरील नूतन महाविद्यालयापासून हा मोर्चा निघणार असून महाराणा प्रताप चौक, शनी मंदिर, नानल पेठ मार्गे हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ येणार आहे. येथे मोर्चाचा समारोप होणार आहे. या मोर्चात संतोष देशमुख यांचे कुटुंबीय तसेच मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील, खासदार संजय जाधव, खासदार बजरंग सोनवणे, आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, नरेंद्र पाटील, ज्योती मेटे आदींची उपस्थिती राहणार आहे.
सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून सुरु आहे. सीआयडीकडून युद्ध पातळीवर तपास सुरु आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात सीआयडीने 100 पेक्षाही जास्त जणांचा जबाब नोंदवला आहे. तसेच या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यालाही अटक केली. वाल्मिक कराड याच्यावर गंभीर आरोप आहे.
या प्रकरणात सीआयडीने आरोपींच्या फोनची कॉल हिस्ट्री, सीडीआर तपासला आहे. सीआयडीला आरोपींच्या स्कॉर्पिओ गाडीतून मोबाईलदेखील सापडले आहेत. त्या मोबाईलमधून व्हिडीओ देखील प्राप्त झाल्याची चर्चा आहे. पण असं असलं तरीही तपासात आतापर्यंत काय-काय पुरावे मिळाले, याबाबत पूर्ण तपास होत नाही तोपर्यंत खुलासा होणार नाही. या प्रकरणात सीआयडीचा युद्ध पातळीवर तपास सुरु आहे.