Download App

विधानसभेत ऐतिहासिक क्षण! विरोधी पक्ष नेत्याची खुर्ची रिकामी तर माजी सहा चेहरे सत्ताधारी बाकावर

मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला. यंदा विधानसभेत विरोधी पक्ष नेतेपदाची खुर्ची रिकामी पाहायला मिळाली. फार क्वचितवेळी विधानसभेतील विरोधी पक्ष नेतेपदाची खुर्ची रिकामी राहते. तर त्याचवेळी तब्बल 6 माजी विरोधी पक्षनेते सत्ताधारी बाकावर एकत्र बसलेले पाहायला मिळाले. (Along with Eknath Shinde, Devendra Fadnavis and Ajit Pawar, 6 opposition leaders were sitting on the ruling bench in assembly)

अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत थेट सत्तेत प्रवेश केला. राष्ट्रवादीतील 36 आमदारांना सोबत घेत ते भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. मात्र विधानसभा अध्यक्षांनी अद्याप आव्हाड यांच्या नावाला मंजूरी दिलेली नाही. त्यामुळे विरोधी पक्ष नेतेपदाची खुर्ची रिकामीच राहिली.

Maharashtra Assembly Session: शिंदेंच्या मंत्रिमंडळात पुन्हा मोठे बदल; पाच मंत्र्यांकडील खाती वाढली

तर सत्ताधारी बाकावर वेगळचं चित्र पाहायला मिळालं. यापूर्वी विरोधी पक्षनेते राहिलेले तब्बल 6 चेहरे सत्ताधारी बाकांवर एकत्र पाहायला मिळाले. यात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्या नावाचा समावेश होता. छगन भुजबळ हे 1991 नंतर काँग्रेसमध्ये आल्यानंतर विरोधी पक्षनेते होते. तर एकनाथ शिंदे हे 2014 विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर 2  महिन्यांच्या कालावधीसाठी विरोधी पक्षनेते होते. त्यानंतर ते फडणवीस सरकारमध्ये मंत्री झाले.

शिंदेंच्या राजीनाम्यानंतर विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी 42 जागा मिळवून तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसकडे आली. काँग्रेसकडून या पदावर राधाकृष्ण विखे-पाटील यांची वर्णी लागली. ते 4 वर्ष या पदावर होते. मात्र त्यानंतर त्यांनीही शिंदेंप्रमाणे जुन 2019 मध्ये सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. पहिल्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या भाजपला विरोधात बसावे लागेल. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विरोधी पक्षनेते देण्यात आले.

शरद पवार म्हणजे विरोधकांचा चेहरा; बंगळुरु बैठकीपूर्वी राऊतांचे मोठे विधान

पुढे अडीच वर्षांनंतर शिंदेंच्या बंडामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. शिंदेंनी भाजपसोबत मिळून सरकार स्थापन केले. फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर अजित पवार विरोधी पक्षनेते झाले. मात्र वर्षभराच्या कालावधीच पवारांनीही राजीनामा देत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. हेच पाच माजी विरोधी नेते आज विधानसभेत पहिल्या बाकावर बसलेले दिसून आले. तर 2014 ते 2019 या कालावधीत विधान परिषदेत विरोधी पक्षनेते असलेले धनंजय मुंडे हेही आता शिंदे सरकारमध्ये मंत्री असल्याने ते देखील सत्ताधारी बाकावर बसले होते.

Tags

follow us