Maharashtra Assembly Session: शिंदेंच्या मंत्रिमंडळात पुन्हा मोठे बदल; पाच मंत्र्यांकडील खाती वाढली

  • Written By: Published:
Maharashtra Assembly Session: शिंदेंच्या मंत्रिमंडळात पुन्हा मोठे बदल; पाच मंत्र्यांकडील खाती वाढली

Maharashtra Assembly Session:  पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेली सर्व खाती शिवसेनेच्या इतर मंत्र्यांकडे वर्ग करण्यात आली आहेत. अधिवेशन काळात सभागृहामध्ये या खात्यांसंदर्भात जे काही प्रश्न उपस्थित केले जातील त्याची उत्तरे देता येणे सोपे व्हावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. (CM Eknath Shinde distribute various ministry to 5 Minister)

यात आता गुलाबराव पाटील यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर उदय सामंत यांच्याकडे नगरविकास आणि माहिती तंत्रज्ञान, शंभूराज देसाईंकडे सामाजिक न्याय आणि दिव्यांग, दादा भुसे यांच्याकडे परिवहन, अब्दुल सत्तारांकडे खनिकर्म आणि दीपक केसरकर यांच्याकडे पर्यावरण खाते देण्यात आले आहे.

जनमत भाजप विरोधात, म्हणून साम, दाम, दंड…; खासदार कोल्हेंचं खळबळजनक वक्तव्य

 

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होणार आहे. हे अधिवेशन 17 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान चालणार आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर सभागृहातले चित्र कसे असणार? राष्ट्रवादीचे आमदार अजित पवारांना धारेवर धरणार? याकडेही राज्याचे लक्ष लागले आहे. सकाळी 11 वाजता विधानसभा तर दुपारी 12 वाजता विधान परिषदेच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे. याच अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या आपल्याकडील खात्यांचे वितरण इतर मंत्र्यांकडे सोपविले आहे.

दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. अशात अजित पवार यांच्यासह 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे शिंदे गटाकडील 3 तर भाजपकडील 6 खाती अजितदादांच्या गटाला देण्यात आली. यानंतर आता भाजप आणि शिंदेच्या गटाच्या आमदारांचे मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष लागले आहे. या विस्तारानंतर मुख्यमंत्र्यांकडील आणि मंत्र्यांकडील अतिरिक्त खात्यांच्या भार हलका होण्याची शक्यता आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube