जनमत भाजप विरोधात, म्हणून साम, दाम, दंड…; खासदार कोल्हेंचं खळबळजनक वक्तव्य

जनमत भाजप विरोधात, म्हणून साम, दाम, दंड…; खासदार कोल्हेंचं खळबळजनक वक्तव्य

Amol Kolhe : आगामी वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे. 2024 मध्ये लोकसभा (Lok Sabha) आणि अनेक राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. यासाठी सगळ्याच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. मात्र, आता राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी देशातील जनमत हे भाजप (BJP) विरोधात असून भाजपला काहीही करून 2024 लोकसभा जिंकायची आहे. त्यासाठी साम, दाम,दंड भेद ही नीती वापरुन पक्ष फोडले जात असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. (Public opinion is against BJP The politics of splitting the party from BJP)

अमोल कोल्हे यांनी त्यांच्या ‘अमोल ते अनमोल’ या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यात अजित पवारांच्या बंडामागची नेमकी खरी वास्तविकता काय हे सांगतांना सांगितलं की, एका सर्वेनुसार, मविआला लोकसभेत 43 टक्के, तर शिंदे-फडणवीस सरकारला 43 टक्के लोकांनी पसंती दिली. तर आणखी एका वृत्तपत्राच्या सर्वेनुसार, मविआत 47.7 तर शिदे फडणवीस 39.3 टक्के लोकांनी पसंती दिली. त्यामुळं महाविकास आघाडीने एकत्रित येऊन लोकसभा निवडणूक लढवली तर इथं भाजपचा पराभव होऊ शकतो. त्यामुळं केंद्रातील मोदी सरकार अस्वस्थ आहे.

सावधान! पावसाळ्यात किडनी होऊ शकते निकामी, जाणून घ्या कशी घ्यायची काळजी 

कोल्हे म्हणाले, कर्नाटक, पंजाब, बिहार सारख्या बहुतांश राज्यात जनमत हे भाजपच्या विरोधात आहे. अगदी सर्वांत मोठं राज्य असलेल्या यूपीतही लोकसभेच्या जागा निवडून येणार नाहीत, अशी भीती भाजपला आहे. युपीनंतर लोकसभेच्या सर्वांत जास्त जागा असलेलं राज्य महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. त्यामुळं भाजपने महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केलं. सर्वेनुसार, मविआ एकत्र आली तर भाजपचा पराभव अटळ आहे. त्यामुळं महाविकास आघाडीत फुट पाडण्याचे प्रयत्न सुरू केलेत. भाजपचे नेते म्हणतात की, भाजपच्या 45 जागा निवडून आणणार. काहीही करून आणि कोणत्याही मार्गाने भाजपला लोकसभेच्या राज्यातील जागा निवडून आणायच्या आहेत, असं कोल्हे म्हणाले.

कोल्हे यांनी सांगितलं की, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला देशभरात 38 टक्के मते मिळाली होती. 62 टक्के लोकांनी भाजपला नाकारले. विरोधक एकत्र आले तर 62 टक्क्यांचा धोका होऊ शकतो हे भाजपला चांगलेच ठाऊक आहे.म्हणून भाजपकडून साम, दाम, दंड, भेद मार्गानी लोकसभा जिंकण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून विरोधी पक्षांत फुट पाडून 62 टक्के मत विभाजनाचा भाजपचा डाव असल्याचं कोल्हेंनी सांगितलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube