Ambadas Danve : आज अंतरवली सराटी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले. आपल्याला जीवे मारण्याचा कट आहे. मला सलाईमधून विष पाजून मारण्याचा कट केला, त्यामुळं मी परवापासून सलाईन घेणंही बंद केलं. या सगळ्यांमागे फडणवीस आहेत, असे आरोप जरांगेंनी केले. दरम्यान, आता ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी या आरोपांवरून सरकारवर जोरदारी टीका केली. जरागेंनी केलेल्या आरोपांची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
फडणवीस…गोळ्या घाल अन् बळी घे मी तयार; जरांगेंची स्वारी ‘सागर’ बंगल्याकडे
जरांगेंनी केलेल्या आरोपानंतर अंबादास दानवे यांनी पत्रकारांनी संवाद साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले, जरांगेंकडून जे आरोप होत आहेत, त्याची चौकशी व्हावी. कारण, ज्या पद्धतीने जरांगेंच्या मागे एवढ्या मोठ्या प्रमाणावर समाज आणि महाराष्ट्र उभा असेल तर त्यांच्या भूमिकेला एक महत्व आहे. त्यामुळं जरांगेंनी केलेल्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे. मराठा आरक्षण दिल्याचा देखावा करत जरांगेंवर वाशीला गुलाल उधलला. जर आरक्षण दिलं असेल तर मग जरांगेंना पुन्हा आंदोलनाला बसण्याची वेळ का आली, असा सवाल दानवेंनी केला. सरकार मराठा आरक्षणासाठी उभं राहिलेलं आंदोलन दडपत आहे, असंही दानवे म्हणाले.
जरांगेंनी नौटंकी बंद करावी, त्यांचा बोलवता धनी…; फडणवीसांवर आरोप होताच भाजपचे नेते आक्रमक
जरागेंच्या आरोपानंतर भाजप नेते प्रसाद लाड यांनी जरांगेवर टीका केली. फडणवीसांचे मराठा समाजावर अनंत उपकार असल्याचं लाड म्हणाले. यावरही दानवेंनी भाष्य केलं. ते म्हणाले, या सरकारने मराठा समाजासाठी नवीन काहीच केलं नाही. त्यांनी कुठलेही मराठा समजाावर उपकार केलं नाहीत. पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारने आधी 16 टक्के आरक्षण दिलं. मग 13टक्के आणि 10 टक्के आरक्षण दिलं. पण, ते आरक्षण टिकलं नाही. तेव्हा तर भाजपचंच सरकार होत. वकीलही त्यांचेचं होते. मग ते आरक्षण का टीकलं नाही? त्यामुळं उपकाराची भाषा कोणी करू नये. विशेषत: भारतीय जनता पक्षाने तर करून नये, असं दानवेंनी ठणकावलं.