‘डुप्लिकेट धंदे अन् दुतोंडीपणे चालायचं हा भाजपचा धंदा’; दानवेंचा हल्लाबोल
Ambadas Danve On Devendra Fadnvis : डुप्लिकेट धंदे अन् दुतोंडीपणे चालायचं हा भाजपचा धंदा, असल्याचं म्हणत ठाकरे गटाचे नेते अंबादान दानवे (Ambadas Danve) यांनी हल्लाबोल चढवला आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी साधेपणाने रहा असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला होता. त्यावरुन दानवेंनी फडणवीसांसह भाजपवर हल्लाबोल चढवला आहे.
‘2015 मध्ये नीति आयागाचे उपाध्यक्ष आता थेट वित्त आयोगाचे ‘हेड’; कोण आहेत अरविंद पनगरिया?
अंबादास दानवे म्हणाले, साधेपणाने रहा अन् संपत्तीच्या बळावर निवडणूका जिंका हे भाजपचं चागंलच काम आहे. प्रत्येक मतदारसंघातून आता पाच हजार लोकं भाजप घेऊन जात आहे. हे पाच हजार लोकं रेल्वेने घेऊन जाणार आहेत, त्यासाठी रेल्वे बुक कोणी केली आहे, पैसे कुठून येणार आहेत? हे सगळं तर संपत्तीचं दर्शनच असल्याचं दानवे म्हणाले आहेत.
Devendra Fadnavis : शिंदे अन् अजितदादांना सोबत का घेतलं? फडणवीसांनी सांगूनच टाकलं
तसेच डुप्लिकेट धंदे करायचे, दुतोंडीपणे चालायंच हा भाजपचा धंदा असून चार्टर फ्लाईट्स, 5 स्टार हॉटेल्स, पाच पाच हजार लोकांसाठी रेल्वे, आणि सांगताहेत की साधे रहा, भाजप फक्त दिखावा करीत असल्याचा आरोपही अंबादास दानवे यांनी केला आहे.
चुम्मा-चुम्मा पुरस्काराचे मानकरी कोण हे…;रोहिणी खडसेंकडून शीतल म्हात्रेंचा खास शैलीत समाचार !
भाजपच्या नेत्यांसमोर तोंड उघडणार नाही :
प्रकल्प गुजरातला जाणं हे नवीन नाही. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आधी प्रोजेक्ट रिपोर्ट, खर्च, जागा ठरवायंच. त्यानंतर गुजरातला प्रकल्प पळवायचा हे काही नवीन नाही. कोकणातील नेते, उदय सामंत, नितेश राणे, दीपक केसरकर जे वटवट करीत असतात त्यांनी स्वत:च्या बुडाखाली काय जळतंय हे पहावं, ते नूसतंच उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात गुंग असल्याचं दानवे म्हणाले आहेत.
‘सालार’नंतर पुन्हा प्रभास करणार धमाका! पोस्टर शेयर करत निर्मात्यांनी दिली मोठी अपडेट
सत्ताधारी रिफायनरी प्रकल्प गुजरातला नेत नाहीत. पाणबुडी कसा नेतात गुजरातला? असा सवालही दानवे यांनी केला आहे. प्रकल्प गुजरातला नेण्यासाठी कोकणातलं नेतृत्व बेजबाबदार आहे. हे सरकार असेपर्यंत हीच परिस्थिती राहणार असून त्यांच्यासमोर कोकणातले नेते तोंड उघडू शकत नाही, असंही ते म्हणाले आहेत.