‘सालार’नंतर पुन्हा प्रभास करणार धमाका! पोस्टर शेयर करत निर्मात्यांनी दिली मोठी अपडेट

‘सालार’नंतर पुन्हा प्रभास करणार धमाका! पोस्टर शेयर करत निर्मात्यांनी दिली मोठी अपडेट

Prabhas Next Film: साऊथ स्टार प्रभास (Prabhas ) आजकाल त्याच्या ‘सालार’ (salaar Movie)चित्रपटामुळे सर्वत्र जोरदार चर्चेत आहे. अभिनेत्याचा हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (box office) दबदबा निर्माण केला असून कमाईच्या बाबतीत अनेक विक्रम मोडले आहेत. आता सालारच्या यशानंतर प्रभासच्या आणखी एका चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.


‘या’ चित्रपटात प्रभास दिसणार: प्रभास आता दिग्दर्शक मारुतीसोबत काम करणार आहे. खुद्द मारुतीने प्रभाससोबतच्या त्याच्या पुढच्या चित्रपटाची घोषणा केली आहे, यानंतर अभिनेत्याच्या चाहत्यांना मोठा आनंद झाला आहे. मारुतीने चित्रपटाचे पोस्टर रिलीज करून प्रभासच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. पोस्टर पाहिल्यानंतर अभिनेत्याचे चाहते खूप उत्साहित झाले आहेत.

दिग्दर्शकाने पोस्टर शेअर करत केली घोषणा: मारुतीने त्याच्या सोशल मीडिया अकाउंट X (ट्विटर) वर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. यासोबत त्याने लिहिले आहे की, उत्साहित आहे आणि खूप दिवसांपासून या क्षणाची वाट पाहत होतो. प्रभासला नव्या अवतारात दाखवताना खूप आनंद होत आहे. लवकरच भेटू

31st संध्याकाळचे GRAND सेलिब्रेशन! वर्षाचे समापन होणार आणखीनच धमाकेदार..

मात्र, या चित्रपटाचे शीर्षक किंवा प्रभासचा लूक अद्याप समोर आलेला नाही. पण मारुतीने त्याच्या रिलीजचे संकेत दिले आहेत. पोस्टनुसार हा चित्रपट पोंगलला रिलीज होण्याची शक्यता आहे. प्रभासच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘सलार’ बद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटाने आतापर्यंत 521.85 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाची कमाई अजूनही सुरूच आहे. या चित्रपटाने शाहरुख खानच्या डंकीलाही मागे टाकले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube