नवा डाव! आशिष शेलारांच्या मंडळाबाहेर शाहंचा इशारा; फडणवीसांनी धाव घेत घेतला कानमंत्र!

मुंबई दौऱ्यादरम्यान शाहंनी भाजप नेत्यांसह महायुतीतील नेत्यांना महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर येऊ नये, जाहीर वाद टाळावेत अशा सूचना केल्या आहेत

Letsupp Image   2024 09 09T132607.677

Letsupp Image 2024 09 09T132607.677

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) दोन दिवसीय मुंबई दौरा आटोपून दिल्लीकडे रवाना झाले आहे. मुंबई दौऱ्यादरम्यान शाहंनी भाजप नेत्यांसह महायुतीतील नेत्यांना महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर येऊ नये, जाहीर वाद टाळावेत अशा सूचना केल्या आहेत. मात्र, मुंबई सोडताना शाह आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये (Devendra Fadnavis) चर्चा झाल्याचे समोर आले आहे. वांद्रेतील गणेश मंडळाबाहेर शाह आणि फडणवीसांमध्ये संवाद झाला. हा संवाद दोनच नेत्यांमध्ये झाल्याने शाहंनी मुंबई सोडनाता फडणवीसांना नेमका काय कानमंत्र दिला याची चर्चा आता सुरू झाली आहे. (Amit Shah Special Message To Devendra Fadnavis)

Ajit Pawar: ..आता विधानसभेला दादांना पाडायचंय का?, गब्बरच्या ‘त्या’ पत्रामुळे बारामतीत खळबळ

नेमकं काय घडलं? 

अमित शाह काल(दि.8) मुंबईत दाखल झाले. यानंतर त्यांनी रात्री सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेतली. या बैठकीत आगामी काळात होणाऱ्या विधानसभेच्या अनुशंगाने दीर्घ चर्चा करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतक आज (दि.9) शाहंनी सपत्नीक लालबागच्या राजाचे दर्शन घेत आशिल शेलार यांच्या मतदारसंघातील सार्वजनिक गणपती मंडळाला भेट देत दर्शन घेतले. शाह दर्शन घेऊन बाहेर पडत असताना  त्यांच्या सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, फडणवीस आणि भाजपचे अन्य नेते उपस्थित होते. मंडपातून बाहेर पडल्यानंतर शाहंनी हाताच्या इशाऱ्याने फडणवीसांना बोलावले.  त्यावेळी फडणवीस क्षणाचाही विलंब न करत धावत शाहंजवळ पोहचले.

Video: बॉम्बेचं नाव मुंबई करण्यात तुमचं योगदान असेल तर आम्ही काय?..राऊतांचा अमित शहांवर वार

फडणीस शाहंच्या जवळ पोहचताच अमित शाह यांनी फडणवीसांच्या कानात काहीतरी सांगितले. यानंतर फडणवीसांनी मान हलवत शाहंना काहीतरी माहिती दिली. आता शाहंनी फडणवीसांना नेमका काय प्रश्न विचारला आणि फडणवीसांनी नेमका कशाला होकार दर्शविला याबाबत कोणतीही माहिती समजू शकलेली नाही. मात्र, शाहंच्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दांडी मारल्याने आणि वांद्यातील गणपती मंडळाच्या भर गर्दीत शांहनी फडणवीसांना जवळ बोलवून नेमकं काय सांगितलं याची चर्चा आता सुरू झाली आहे.

Exit mobile version