Nitin Desai Death : नितीन देसाईंच्या बातमीवर अजिबात विश्वासच बसत नाही, त्यांच्या जाण्याने पोरका झालो, असल्याची भावना राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे. कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर अमोल कोल्हे यांनी ट्विटरद्वारे दुख: व्यक्त केलं आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये वन संरक्षक भरतीचा पेपर फुटला, एकाला अटक, 7 जणांविरूध्द गुन्हा दाखल
अमोल कोल्हे ट्विटमध्ये म्हणाले,”प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीनजी देसाई यांच्या दुर्दैवी निधनाची बातमी माझ्यासाठी अत्यंत धक्कादायक आहे. या बातमीवर अजिबात विश्वास बसत नाहीये. कला क्षेत्रातील माझ्या आजवरच्या प्रवासात मला लाभलेले नितीन दादांचे मार्गदर्शन आणि त्यांची साथ माझ्यासाठी खूप मोलाची ठरली आहे.
China : बिजींगमध्ये पावसाचा कहर; 20 जणांचा मृत्यू; मेट्रो-रेल्वे बंद, विमानांची 400 उड्डाणं रद्द
ज्या ‘राजा शिवछत्रपती’ मालिकेत मला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली, त्या मालिकेचे निर्माते नितीन दादाच होते. त्यांच्या अचानक जाण्याने मनात पोरके झाल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! देसाई कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, तसेच नितीन दादांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच आई-जगदंबेचरणी प्रार्थना!” असं ट्विट कोल्हेंनी केलं आहे.
‘आंग सान स्यू की’ यांना दिलासा, लष्कराकडून पाच प्रकरणांमध्ये माफी
दरम्यान, कला क्षेत्राच्या प्रवासात मला नितीनदादांचं लाभलेलं मार्गदर्शन आणि साथ ही मोलाची ठरली आहे. ‘राजा शिवछत्रपती’ मालिकेचे निर्मातेही नितीनदादाच होते, या मालिकेत मला शिवरायांची भूमिका साकारण्याचं संधी मिळाली होती, असंही ते म्हणाले आहेत.
नितीन देसाई यांनी आज पहाटेच्या सुमारास आपल्या एनडी स्टुडिओत गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे चित्रपटसृष्टी हादरुन गेली आहे. देसाईंच्या निधनाने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.