Download App

6 जूनचा राज्याभिषेक बंद करा म्हणणारा नक्कीच पिसाळलेला! अमोल मिटकरींचा संभाजी भिडेंवर हल्लाबोल

Amol Mitakri On Sambhaji Bhide Statement Cancelled Shivarajyabhishek Din : शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी (Sambhaji Bhide) शिवराज्यभिषेक दिनावर एक वक्तव्य केलं होतं. ते आता वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. रायगडावरील 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा हा कायमस्वरूपी नामशेष करायला पाहिजे, असं वक्तव्य आज कोल्हापुरात (Shivarajyabhishek Din) बोलताना संभाजी भिडे यांनी केलंय. यावर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची (Amol Mitakri) प्रतिक्रिया समोर आली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी X अकाउंटवर यासंदर्भात एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये मिटकरींनी म्हटलंय की, 6 जुनचा राज्याभिषेक बंद करा, म्हणणारा नक्कीच पिसाळलेला (Maharashtra Politics) आहे. एकदा कुणी पिसाळला तर, त्याची तात्काळ नसबंदी करणे समयसंमत आणि समाजहिताचे आहे. तसे न केल्यास पिसाळलेली विकृती समाजाला चावत सुटते. खबरदारी म्हणुन सरकारने तत्काळ दखल घ्यावी, अशा शब्दांत मिटकरींनी संभाजी भिडे यांच्यावर केली आहे.

चांगल्या झोपेसाठी तोंडावर पट्टी लावणं… बेतू शकतं जीवावर; तज्ज्ञांनी ‘या’ ट्रेंडला म्हटलंय धोकादायक

संभाजी भिडे यांनी कोल्हापुरमध्ये माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं की, रायगडावरून वाघ्या कु्त्र्याचा पुतळा काढता कामा नये. याला राजकारणाचा विषय करता कामा नही. 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा करण्याची पद्धत नामशेष केली पाहिजे. आता 76 वर्ष झाली तरी आपण आपलं सगळं मानसिक अधिष्ठान ब्रिटिशांच्या स्वाधीन ठेवलं आहे. महाराजांचा राज्याभिषेक झालेल्या तिथीप्रमाणेच शिवराज्याभिषेक स्मरण दिन साजरा केला केला पाहिजे. 6 जून रोजीचा शिवराज्यभिषेक दिन सोहळा कायमचा बंद केला पाहिजे, असं संभाजी भिडे यांनी म्हटलं होतं.

धक्कादायक! गुगल मॅपवर बालेवाडीतील क्रीडा संकुलाच्या नावात ‘औरंगजेब’; प्रकरण पोलीस ठाण्यात..

तर वाघ्या कुत्र्‍याच्या समाधीवर बोलताना संभाजी भिडे यांनी म्हटलंय की, वाघ्या कुत्र्‍याची समाधी नको म्हणणारे कोणत्या कुवतीचे आहे. याचा सुद्धा विचार व्हायला पाहिजे. तर यासाठी एखादं विशेष मंडळ स्थापून यासंदर्भात निर्णय घेतला जावा, असंही संभाजी भिडे यांनी म्हटलं. तर यावेळी बोलताना भिडे यांनी म्हटलं होतं की, आपण राजकीय लोकांच्या वक्तव्यालाच इतिहास संशोधक म्हणत आहोत.

 

follow us