Download App

तू ओबीसीसाठी काय केलं ते जनतेला सांग; अमोल मिटकरी अन् लक्ष्मण हाके यांच्यात कलगीतुरा

अजित पवार हे पोल्ट्री फार्म वाले आहेत. त्यांनी ओबीसींचा निधी अडवला अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली होती. आता

Amol Mitkari vs Laxman Hake : लक्ष्मण हाकेंना विधानसभेमध्ये फक्त 527 मतं पडली होती, त्यांनी अजित पवारांवर टीका करू नये असं आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं होतं. त्यावर लक्ष्मण हाके यांनी उत्तर दिलं आहे. (Hake) अजित पवारांचा पोरगा निवडणुकीत पडला, मग त्याच्या मतावरुन त्याची लायकी शोधायची का असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे हा वाद आता पुन्हा उफाळण्याची शक्यता आहे.

अजित पवार हे पोल्ट्री फार्म वाले आहेत. त्यांनी ओबीसींचा निधी अडवला अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली होती. आता त्यांनी पार्थ पवार यांच्यावरही टीका केली. लक्ष्मण हाकेंच्या या टीकेवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी उत्तर दिलं. आतापर्यंत प्रत्येक निवडणुकीत आपलं डिपॉझिट गमावणारे लक्ष्मण हाके ओबीसींचे नेते कसे? असा प्रश्न अमोल मिटकरी यांनी केला.

विधानसभा निवडणुकीत प्रतिसाद का मिळाला नाही? मनोज जरांगेंनी आत्मचिंतन करावं, लक्ष्मण हाकेंचा सल्ला

तुझ्याजवळ असलेली गाडी तू स्वतः घेतली की जनतेने दिली, हे तू खरं जनतेला सांगावं. 2014च्या निवडणुकीत त्याने निवडणूक लढण्यासाठी एका वकिलाकडून 50 हजार रुपये घेतले होते. त्यावेळी तुला फक्त 527 मत विधानसभेत मिळाली होती’ अशा शब्दात आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे. अजितदादांशी तुलना करताना आपली औकात लक्ष्मण हाकेने पहावी. त्या तसंच, हाकेला जास्त भाव देण्याची गरज नाही. मराठा ओबीसी वाद निर्माण करण्यात लक्ष्मण हाके तुझा ही खारीचा वाटा आहे. असंही मिटकरी म्हणाले.

तू ओबीसीसाठी काय केलं ते जनतेला सांग? मी आमदार झाल्यावर माझ्या गावात माझी ग्रामपंचायत निवडून आणली. जिल्हा परिषदेत पराभूत झालो, तरी सन्मानजनक मते मिळवली. तुला आतापर्यंतच्या सर्व निवडणुकीत मिळून साडेसहा हजारावर मते मिळाली नाहीत. लक्ष्मण हाके भूंकत राहिला तर मी त्याच्या विरोधात नक्कीच बोलेल. मी त्याच्या अंगावर त्याचे अंतर्वस्त्र पण शिल्लक ठेवणार नाही. तुला तुझ्या औकातीतच उत्तर द्यावे लागेल असंही ते म्हणाले आहेत.

 

follow us