Download App

बच्चू कडूंना धक्का ! चांदूरबाजार संस्थेच्या निवडणुकीत मिळाल्या फक्त ‘इतक्या’ जागा

Bachchu kadu : शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांना घरच्याच मैदानात जोरदार झटका बसला आहे. चांदुरबाजार तालुका खरेदी-विक्री संस्थेच्या निवडणुकीत प्रहारचे फक्त तीन उमेदवार विजयी झाले आहेत. हा कडू यांच्यासाठी धक्कादायक निकाल आहे. यावेळी विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी 50 खोके एकदम ओके अशी घोषणाबाजीही केली.

संस्थेच्या 15 संचालकपदासाठी 19 मार्च रोजी मतदाव घेण्यात आले. त्यानंतर काल सोमवारी मतमोजणी पार पडली. यामध्ये शेतकरी पॅनेल आणि सहकार पॅनेल यांच्यात लढत होती. सहकार पॅनेलने 12 जागा पटकावल्या तर आमदार कडू यांच्या शेतकरी पॅनेलचे फक्त 3 संचालक विजयी झाले.

वाचा : बावनकुळेंचे जागावाटप जाहीर! बच्चू कडू म्हणाले, आमचा शिंदे सरकारला..

या निवडणुकीत बबलू देशमुख, सुरेखा ठाकरे, प्रमोद कोरडे यांच्या सहकार पॅनेलने घवघवीत यश संपादन केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. व्ही. भुयार यांनी निवडणुकीचा निकाल जाहीर केला.

या निवडणुकीत सहकार पॅनेलचे प्रताप किटुकले (28), श्रीपाद आसरकर (27), कुलदीप सोनार (27), राजेंद्र खापरे (27) मते मिळाली. शेतकरी पॅनेलच्या अनंत काळे (27), साहेबराव पोहोरकर (27), प्रभाकर किटुकले (27) मते मिळाली.

बच्चू कडूंच्या ‘त्या’ वक्तव्याने आसाम विधानसभेत गदारोळ; चूक लक्षात येताच मागितली माफी

वैयक्तिकचे सतीश गणोरकर (2141), संजय गुजर (2030), रावसाहेब लंगोटे (2111), महिला राखीवमध्ये अनिता देशमुख (2170), सुनित काळे (2154), विमुक्त जाती जमातीमध्ये विलास शेकार (2222) यांचा समावेश आहे.  या निवडणुकीत एकूण 558 मते बाद ठरली.

Tags

follow us