बच्चू कडूंच्या ‘त्या’ वक्तव्याने आसाम विधानसभेत गदारोळ; चूक लक्षात येताच मागितली माफी

बच्चू कडूंच्या ‘त्या’ वक्तव्याने आसाम विधानसभेत गदारोळ; चूक लक्षात येताच मागितली माफी

Bachchu Kadu : अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Budget) भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर बोलताना आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद थेट आसामच्या विधानसभेत उमटले आहेत. आसाममध्ये लोक कुत्रे खातात असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून आसाम विधानसभेत जोरदार गदारोळ उडाला. बच्चू कडूंना अटक करण्याची मागणी करण्यात आली. यानंतर आता बच्चू कडूंनी माफी मागत भूमिका स्पष्ट केली आहे.

कडू म्हणाले, की ‘नागालँडमधील लोक कुत्रे खातात. मला वाटलं आसाममधील लोक कुत्रे खातात. दोन्ही राज्ये जवळपास आहेत. माझ्याकडून चुकून आसाम नाव घेतले गेले. नागालँड म्हणायला हवं होतं. इतकीच माझी चूक आहे. यामुळे त्या राज्यातील लोकांच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल मी माफी मागतो.’

वाचा : मी भाजपचा खासदार माझ्यामागे ईडी लागणार नाही, राष्ट्रवादीकडून तो व्हिडिओ व्हायरल

कडू यांनी जे वक्तव्य केले होते. त्यामुळे आसाम विधानसभेत गोंधळ पाहण्यास मिळाला. विधानसभेच्या अधिवेशनात राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांचे भाषणही थांबवावे लागले होते. काँग्रेसचे आमदार कमलाख्या डे पूरकायस्थ यांनी अधिवेशना दरम्यान हा मुद्दा सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला. आसामबद्दल इतके मोठे वादग्रस्त वक्तव्य केले जाते तरीदेखील सरकार काहीच करत नाही, सरकार इतके शांत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यानंतर विरोधी पक्षातील आमदारांनी कडूंना अटक करण्याची मागणी देखील केली.

दिव्यांग मुलीची स्मार्टफोनची मागणी, बच्चू कडूंनी एका तासात पुरवला हट्ट

याआधी कडू म्हणाले होते की ‘महाराष्ट्रातील सर्व भटके कुत्रे आसाममध्ये पाठवा. तिथे त्यांना किंमत आहे. कारण तेथील लोक कुत्र्यांचे मांस खातात. आपण जसा बोकड खातो तसे तिकडे कुत्र्यांचे मांस खाल्ले जाते. आम्ही गुवाहाटीला गेलो होतो तेव्हा आम्हाला याची माहिती मिळाली.’

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube