दिव्यांग मुलीची स्मार्टफोनची मागणी, बच्चू कडूंनी एका तासात पुरवला हट्ट

दिव्यांग मुलीची स्मार्टफोनची मागणी, बच्चू कडूंनी एका तासात पुरवला हट्ट

सोलापूर : दिव्यांगांच्या (disabled)मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे (Prahar Sanghatana)आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) हे नेहमीच संघर्ष करत असतात. त्यातच आता बुधवारी बच्चू कडू यांनी एका दिव्यांग मुलीला मोबाईल फोन भेट दिल्यानं आमदार कडू पुन्हा चर्चेत आले आहेत. झालं असं की, माढा (Madha)तालुक्यातील एका दिव्यांग बच्चू कडू यांनी स्मार्टफोन (Smartphone)भेट दिलाय.

नयना जोकर (Nayana Joker)या दिव्यांग मुलीनं कुटुंबीयांकडं स्मार्टफोनसाठी (Smartphone)मागणी केली होती. दिव्यांग असल्यामुळं नयनला अनेक अडचणीचा सामना करावा लागतोय. शिक्षण घेण्यातही तिला अडचणी येताहेत. त्यामुळं तिनं कुटुंबियांकडं फोन मागितला. पण कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नसल्यानं ते स्मार्टफोन देऊ शकत नव्हते.

Indian Amry कडून अग्निवीर भरती प्रक्रियेत मोठा बदल

बच्चू कडू यांना ही गोष्ट समजताच एका तासात स्मार्टफोन त्या दिव्यांग तरुणीला घरपोच पाठवला. त्यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांनी नयनचा संवाद आमदार बच्चू कडू यांच्याशी करून दिला. स्मार्टफोन मिळाल्यानंतर दिव्यांग तरुणीनं बच्चू कडू यांचे आभारही मानले. स्मार्टफोन मिळाल्यानंतर नयनाच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube