Amruta Fadanvis : अमृता फडणवीसांना लाच देणाऱ्या डिझायनरला अटक

Amruta Fadanvis Bribe Case :  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 1 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्या डिझायनर अनिक्षाला उल्हासनगरमधून पोलिसांनी अटक केली आहे. अमृता फडणवीस यांनी काल या प्रकरणी मलबार हिल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 17T115110.378

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 03 17T115110.378

Amruta Fadanvis Bribe Case :  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 1 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्या डिझायनर अनिक्षाला उल्हासनगरमधून पोलिसांनी अटक केली आहे. अमृता फडणवीस यांनी काल या प्रकरणी मलबार हिल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले आहे.

या संपूर्ण प्रकरणाची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली होती. या महिलेचा महाविकास आघाडीच्या काळात मुंबईत जे सीपी होते त्यांच्याशी संपर्क होता, असे ते म्हणाले होते. आज पोलिस या डिझायनर अनिक्षाला कोर्टात हजर करणार असून कोर्टाकडून अनिक्षाची पोलिस कस्टडीची मागणी करणार आहेत.

‘तो’ व्यक्ती गेल्या सरकारच्या काळात एका पोलीस आयुक्ताच्या संपर्कात; फडणवीस यांचा इशारा कोणाकडे?

दरम्यान, या प्रकरणी फडणवीसांनी काल सभागृहात माहिती दिली होती. फडणवीस म्हणाले, की माझी पत्नी अमृता फडणवीसने एक एफआयआर दाखल केला आहे की तिच्यावर दबाव आणून माझ्या माध्यमातून काही काम करून घेण्याचा प्रयत्न झाला. सुरुवातीला पैसे ऑफर करण्यात आले आणि नंतर ब्लॅकमेल करण्यात आले. अनिल जयसिंघानी नावाचा एक व्यक्ती असून तो मागील सात ते आठ वर्षांपासून फरार आहे. त्यांची मुलगी आहे. ती शिकलेली आहे. ही मुलगी कधीतरी अमृताला भेटली होती. पुढे मात्र तिने माझ्या वडिलांना चुकीच्या केसमध्ये फसवण्यात आले असून तुम्ही त्यांना सोडवा असे सांगितले,  अशी माहिती त्यांनी सभागृहात दिली आहे.

एक कोटींचं लाच प्रकरण नेमकं काय? फडणवीसांकडून संपूर्ण घटनेचा उलगडा

याशिवाय देवेंद्र फडणवीस यांनी एक गौप्यस्फोट देखील केला आहे. ते म्हणाले की गेल्या सरकारच्या काळात एका पोलीस आयुक्ताच्या हा माणूस संपर्कात होता. पोलिसांत माहिती घेतली असता गेल्या सरकारच्या काळात त्याच्यावरचे गुन्हे काढून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. चार्जशीट मधून काही गोष्टी बाहेर येतील, पुराव्याशिवाय कोणाचेही नाव घेणार नाही. असंही यावेळी फडणवीस म्हणाले.

 

Exit mobile version