Download App

Amruta Fadnavis Bribe Case : अनिक्षाला जमीन… तर अनिल जयसिंघानीला न्यायालयीन कोठडी

  • Written By: Last Updated:

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयाची लाच मागितल्या प्रकरणी अटक झालेल्या अनिक्षा जयसिंघानी कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. तर आणि अनिल जयसिंघानीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अनिक्षाला कोर्टाने ५० हजार रुपयाच्या बॉण्डवर त्यांना जामीन मंजूर केला आहे.

https://twitter.com/ANI/status/1640324876081790976

काही दिवसांपासून अनिक्षा आणि अनिल जयसिंघानी प्रकरणावर महाराष्ट्रासह राज्यात वातावरण तापलं आहे. डिझायनर असलेल्या अनिक्षाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना १ कोटी रूपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला. यानंतर अनिक्षा आणि अनिल जयसिंघानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणावरून अनिक्षा आणि अनिल जयसिंघानी या दोघांनाही अटक करण्यात आली होती.

बाहेरच्या राज्यातील कोणी आमच्या इथं नाक खुपसू नये, विखेंचा तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना टोला

नेमकं काय आहे प्रकरण ?

एका केसमध्ये मदत करण्यासाठी डिझायनर अनिक्षा जयसिंघानी या मुलीने अमृता फडणवीस यांना एक कोटी रूपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला. शिवाय त्यांना धमकी देखील देण्यात आली अशी तक्रार अमृता फडणवीस यांनी मुंबईतील (Mumbai) मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये (Malabar Hill Police Station) २० फेब्रुवारी रोजी तक्रार दिली होती.

या तक्रारीनंतर अनिक्षाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अनिक्षा ही गेल्या १६ महिन्यांहून अधिक काळ अमृता फडणवीस यांच्या संपर्कात होती आणि तिने अमृता यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. एका गुन्ह्यात मदत करण्याची मागणी करत १ कोटी रुपयांच्या लाचेची ऑफर अमृता फडणवीस यांना अनिक्षा आणि तिच्या वडिलांनी दिल्याचा आरोप त्यांनी केला.

सावधान! नगर – पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव, धक्कादायक आकडेवारी आली समोर

Tags

follow us