Sorcery : पुरोगामी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर (Kolhapur) जिल्हातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील राधानगरी तालुक्यातील कौलव येथे (Superstition) गुप्तधन मिळवण्याचं आमिष दाखवून एका घरामध्ये खड्डा खणून अघोरी धार्मिक विधी करणाऱ्या घरमालक, मांत्रिक व अन्य चौघांना राधानगरी पोलिसांनी काल मध्यरात्री अटक केली आहे. (Sorcery) नरबळी, अनिष्ट-अघोरी प्रथा व जादुटोणाविरोधी कायद्यांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिसूचनेवर ८ लाख हरकती; ‘सगेसोयरे’ची अंमलबजावणी कशी होणार? छाननी करण्याचं काम सुरू
यांच्यावर गुन्हा दाखल
घरमालक शरद धर्मा माने (रा. कौलव), मांत्रिक महेश सदाशिव काशिद (राजमाची, ता. कऱ्हाड), अाशिष रमेश चव्हाण, चंद्रकांत महादेव धुमाळ (दोघे रा. मंगळवार पेठ, कऱ्हाड) आणि संतोष निवृत्ती लोहार (वाझोली, ता. पाटण), कृष्णात बापू पाटील (पुलाची शिरोली, ता. हातकणंगले) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद माजी उपसरपंच अजित पाटील यांनी दिली. या घटनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.
कौलव येथे मुख्य रस्त्याशेजारी असणाऱ्या शरद माने यांच्या घरामध्ये गुप्तधन मिळवण्याच्या उद्देशाने गेले आठ दिवस काही प्रकार व धार्मिक विधी सुरू असल्याची चर्चा दबक्या आवाजात ग्रामस्थांमध्ये होती. मंगळवारी रात्री या घरामध्ये अघोरी धार्मिक विधी व जादुटोणा करणाऱ्या पाच व्यक्ती आल्याचं ग्रामस्थांना समजलं. ग्रामस्थांनी ही गोष्ट सरपंच रामचंद्र कुंभार यांच्या निदर्शनास आणून दिली. कुंभार यांनी सतर्कता दाखवत त्या घरामध्ये जाऊन माहिती घेतली. त्यावेळी तेथे देवघरात चार ते पाच फुटाचा खड्डा खोदल्याचं दिसून आलं. अशी माहिती राधानगरी पोलिसांनी दिली.
अब्दुल सत्तार आणि ठाकरेंच्या खासदाराची गुप्त भेट, मराठवाड्यात राजकीय भूकंप होणार?
तेथे मांत्रिक महेश काशीदसह चौघांकडून केळीच्या पानावर हळद-कुंकू, टाचण्या मारलेले लिंबू, नारळ, सुपारी, केळी ठेवून मंत्रोच्चारात अघोरी विधी सुरू असल्याचं निदर्शनास आलं. याबाबत सरपंचांनी घरमालक माने यांच्याकडे चौकशी केली. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. सरपंचांनी ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्षांना बोलावून राधानगरी पोलिसांना याची माहिती दिली. राधानगरीचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे तत्काळ सहकाऱ्यांसह गावात दाखल झाले. त्यांनी संबंधित घराची पाहणी केली.
घरातील खड्डा, शेजारी असणारे लिंबू व इतर संशयास्पद वस्तू यावरून गुप्तधनाच्या लालसेने हा प्रकार केल्याच्या संशय बळावला. त्यांनी घरमालक मानेसह इतर पाचजणांना ताब्यात घेतलं. मंगळवारी मध्यरात्री त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. दरम्यान त्यांच्याकडे चौकशी केली असता, मानेला गुप्तधन मिळवून देण्यासाठी खड्डा खोदल्याचं व विधी केल्याचं अन्य चौघांनी पोलिसांना सांगितलं.