Download App

Anil Parab : ईडीला संपूर्ण सहकार्य करूनही कदम यांना अटक, सोमय्यांच्या आदेशावर ईडी चालते का?

  • Written By: Last Updated:

शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांना ईडीने धक्का दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील साई रिसॉर्टप्रकरणी (Sai Resort) रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम (Sadananda Kadam) यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. यानिमित्ताने साई रिसॉर्टचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. सदानंद कदम यांना ताब्यात घेतले असून ईडीचे पथक मुंबईकडे रवाना झाले आहे.

खेडमधील कुडोशी येथील त्यांच्या अनिकत फार्म हाऊस या निवासस्थानातून सदानंद कदम यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. पण यावरून पुन्हा राजकारण सुरु झाले आहे. किरीट सोमय्या यांच्या आदेशावर ईडी चालते आहे का असा सवाल माजी मंत्री अनिल परब यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा :  XI Jinping यांची ताकद वाढली, सलग तिसऱ्यांदा पदभार स्विकारणारे ठरले पहिले राष्ट्रपती

ईडीला संपूर्ण सहकार्य करूनही अटक

यावेळी बोलताना अनिल परब म्हणाले की सदानंद कदम यांनी ईडीला संपूर्ण सहकार्य करुनही त्यांना ईडीने समन्स दिले, सदानंद कदम यांचे कालचे हाताचे ऑपरेशन झाले आणि कालच त्यांना ईडीकडून समन्स देण्यात आले. त्यांनी विश्रांतीचह गरज असल्याचे ईडीला कळवले होते तरीही त्यांना ताब्यात घेण्यात आले असून मुंबईत आणले जात आहे.

किरीट सोमय्यांच्या सांगण्यावर ईडी चालते का ?

यावेळी अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांच्यावर देखील टीका केली. ते म्हणाले की, किरीट सोमय्यांना सर्व गोष्टी माहिती आहेत, याचा अर्थ किरीट सोमय्यांच्या सांगण्यावर ईडी चालते आहे का? ईडीच्या अधिकार्यांना पूर्ण सहकार्य करून, सर्व माहिती देऊनही सदानंद कदम यांना येथे बोलावले आहे. म्हणून केवळ खेडच्या सभेचा हा परिणाम आहे का असाही प्रश्न त्यांनी केला.

दरम्यान दापोली, मुरुड येथील साई रिसॉर्टची मालकी सध्या सदानंद कदम यांच्याकडे आहे. सदानंद कदम हे माजी मंत्री रामदास कदम यांचे सख्खे लहान बंधू आहेत. सदानंद कदम यांच्या अटकेनंतर किरीट सोमय्या यांनी अब तेरा क्या होगा अनिल परब, असा सवाल विचारला आहे. त्यामुळे आता अनिल परब यांना अटक होणार का? हे पाहणं महत्त्वाचे असणार आहे.

shi

Tags

follow us