Anil Parab On Yogesh Kadam : कधीकाळी एकाच शिवसेनेत सोबत काम करणारे दोन (Kadam) शिवसैनिक सध्या जोरदार एकमेकांवर तुटून पडले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी राज्याचे गृहराज्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार योगश कदम यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केलेत. परब यांनी आज पत्रकार परिषद घेतली.
रत्नागिरीमधील जगबुडी नदीतील गाळ काढला जातोय. मला हा गाळ काढू द्या, असं पत्र कदमांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं होतं वाळू मिश्रित हा गाळ आहे. यामध्ये वाळू वेगळी केली जात आहे. ही वाळू योगिता डेंटल कॉलेजच्या प्रांगणात पडली आहे. हे कॉलेज योगेश कदम यांच्या बहिणीचं आहे. जगबुडी नदीतील ही वाळू या योगिता डेंटल कॉलेजजवळ कशी आली? असा थेट प्रश्न करत परबांनी खळबळ उडवून दिली आहे.
सावली डान्सबार, पोलिसांची कारवाई अन् गृहराज्यमंत्री योगेश कदमांवर अनिल परबांचा खळबळजनक आरोप
योगेश कदम यांच्या आईच्या नावावर असलेल्या सावली बार प्रकरणासोबतच जगबुडी नदीतील वाळूचा विषय समोर आणला आहे. दरम्यान, ही वाळू येथे काय करते?, या वाळूचं काय केलं जातं?, असा सवालही परब यांनी उपस्थित केलाय. तसंच, ज्या ठिकाणी वाळू पडली त्याचं आम्ही जिओ टॅग लावून ड्रोन कॅमेरामार्फत शूट केलं आहे. याचे फोटो आणि व्हिडीओ माझ्याकडे आहेत. मी याचे पेन ड्राईव्ह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्या देणार आहे, असा इशाराच परब यांनी दिलाय.
महादेव नाल्यातील रेती उपसायची होती. मात्र, हे सावित्री नदीची रेती उपसत होते. अकील मुकादम हे सगळं काम करतो. ही रेती उपसतो, हा त्यांच्या घरात काम करणारा माणूस आहे. लक्षवेधी लागल्यानंतर आता गाळ उपसा बंद केला. सगळे पेपर, पेन ड्राईव्ह आणि इतर सगळी कागदपत्रे मी उद्या देवेंद्र फडणवीसांना देणार आहे. तसंच, योगेश कदम यांचा देवेंद्र फडणवीसांना राजीनामा घ्यावा, कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचा राजीनामा घेऊ शकणार नाही, असा हल्लाबोलही अनिल परब यांनी केला.
योगेश कदम यांचे वडील काल म्हणाले की, माझे मुलं किती कर्तृत्वान आहे. मात्र हे त्यांचे प्रताप असल्याची टीका अनिल परब यांनी केली. तुमच्यात हिंमत असेल अब्रूनुकसानीचा दावा ठोका असं म्हणत माझ्यावर हक्कभंग आणा अशी मागणी करत देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा घ्यावा, अन्यथा मी आता या प्रकरणात कोर्टात जाईल, असा इशाराही अनिल परब यांनी यावेळी दिलाय.