Kadambari Jethwani: खोट्या प्रकरणात अडकवून मुंबईकर अभिनेत्रीचा छळ, तीन वरिष्ठ आयपीएस निलंबित

Kadambari Jethwani: खोट्या प्रकरणात अडकवून मुंबईकर अभिनेत्रीचा छळ, तीन वरिष्ठ आयपीएस निलंबित

Mumbai Actress Kandabri Jethwani Case: आंध्र प्रदेश सरकारने रविवारी तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. (IPS Officers Suspended) यामध्ये डीजी दर्जाच्या अधिकाऱ्याचाही समावेश आहे. या भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकाऱ्यांवर मुंबईतील अभिनेत्री आणि मॉडेल कादंबरी जेठवानी (Kandabri Jethwani ) यांच्या विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यात योग्य तपास न (Kandabri Jethwani Case) करता घाईघाईने अटक करणं आणि तिचा छळ केल्याचा आरोप या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांवर लावण्यात आले आहे.

‘या’ आयपीएस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले

सरकारी आदेशानुसार, माजी गुप्तचर प्रमुख पी. सीताराम अंजनेयुलू (महासंचालक पद) यांना निलंबित करण्यात आले आहे. अभिनेत्री जेठवानीच्या छळप्रकरणी त्यांची भूमिका उघडकीस आल्यानंतर विजयवाडाचे माजी पोलीस आयुक्त कांथी राणा टाटा (महानिरीक्षक) आणि तत्कालीन पोलीस उपायुक्त (विजयवाडा) विशाल गुन्नी (पोलीस अधीक्षक ) यांना निलंबित करण्यात आले आहे.

पोलिस अधिकाऱ्यांनी अभिनेत्रीला धमकावले

अभिनेत्री कांदबरी यांनी आरोप केला आहे की, मागील सरकारच्या काळात पोलीस अधिकाऱ्यांनी मुंबईतील महामंडळाच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यावर दाखल केलेला गुन्हा मागे न घेतल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली होती. मागील वायएसआर काँग्रेस सरकारच्या काळात तिने फसवणूक केल्याचा आरोप करणाऱ्या पक्षाच्या नेत्याविरुद्ध केलेल्या तक्रारीच्या आधारे अभिनेत्रीला या वर्षाच्या सुरुवातीला अटक करण्यात आली होती.

Mumbai Crime: मेकअप आर्टिस्ट सारा यंथनचा मृतदेह आढळल्याने खळबळ; घातपात की आत्महत्या?

अभिनेत्रीला अटक करण्याचे आदेश

असा आरोप आहे की तत्कालीन गुप्तचर प्रमुखांनी अभिनेत्रीला अटक करण्यासाठी इतर दोन अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते, जरी त्या तारखेपर्यंत तिच्यावर गुन्हा दाखल झाला नव्हता. सरकारी आदेशानुसार, रेकॉर्डनुसार, अभिनेत्री कादंबरी जेठवानी विरुद्ध एफआयआर 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 6:30 वाजता नोंदवण्यात आला, तर अंजनेयुलू यांनी एफआयआर नोंदवण्यापूर्वी 31 जानेवारी रोजी कंठी राणा टाटा आणि विशाल गुन्नी यांना सूचना दिल्या होत्या.

खोटा गुन्हा दाखल

अभिनेत्रीने अलीकडेच काही पोलिस अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली होती की तिच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तिचा छळ करण्यात आला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube