Download App

Sai Resort प्रकरणावर अनिल परब थेट सभागृहातच बोलले…

मुंबई : मागील अनेक दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या आणि महाविकास आघाडीचे माजी मंत्री अनिल परब यांच्यात खडाजंगी सुरु आहे. साई रिसॉर्टप्रकरणी नाहक बदनामी होत असल्याचं म्हणत अनिल परब विधानपरिषदेच्या सभागृहात चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

मनीष सिसोदियांच्या अडचणीत वाढ, 17 मार्चपर्यंत ईडी कोठडी

यावेळी अनिल परब म्हणाले, ज्यांना नोटीसा दिल्या पाहिजेत त्यांना नोटीसा गेल्या नाहीत आणि मला नोटीसा पाठवल्या आहेत. ही ही एका लोकप्रतिनिधीची नाहक बदनामी झाली आहे.

इमारती रिडेव्हलपमेंटला जात असल्याने आम्ही स्वत:हून इमारत तोडत असल्याचं पत्र दिलंय. त्यावर मी इमारती जाऊन पाहणार असल्याचं किरीट सोमय्या पत्रकार परिषद घेऊन म्हणाले आहेत. तसेच भूखंडाप्रकरणी गंभीर आरोपही सोमय्यांनी केले आहेत.

उन्हाळ्यात शरीराला डिहायड्रेट ठेवण्यासाठी ‘ही’ पेय नक्की घ्यावी

एका लोकप्रतिनिधीची वारंवार बदनामी करणे, अनेक गंभीर स्वरुपाचे आरोप करणे, यावर कुठंतरी पायबंद घातला पाहिजे असल्याची मागणी अनिल परबांनी यावेळी केली आहे.

तसेच ज्या अधिकऱ्यांनी अनधिकृत बांधकाम ठरवून मला नोटीस पाठवली त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, त्याबाबतचं निवेदनही अनिल परब यांनी सभागृहात सादर केलं आहे.

PM Modi : ऑस्ट्रेलियामध्ये मंदिरांवर होणारे हल्ले ही दु्:खद बाब; मोदींनी व्यक्त केला खेद

दरम्यान, हक्कभंग पाहुन त्यावर योग्य तो निर्णय घेणार असल्याचं आश्वासन विधानपरिषदेच्या सभापती निलमताई गोऱ्हे यांनी अनिल परबांनी दिलं आहे.

विधानपरिषदेची हक्कभंग समिती अद्याप तयार करण्यात आली नसून त्यावर लवकरच काम करुन हक्कभंग समिती स्थापन करणार असल्याचंही गोऱ्हे यांनी यावेळी स्पष्ट केलंय.

दरम्यान, काही दिवसांपासून ईडीकडून साई रिसॉर्टप्रकरणी कसून चौकशी सुरु आहे. ईडीकड़ून सदानंद कदम यांची चौकशीही करण्यात आली. साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब यांच्यासोबत सातत्याने सदानंद कदम यांचे नाव जोडले जात होते.

Tags

follow us