मनीष सिसोदियांच्या अडचणीत वाढ, 17 मार्चपर्यंत ईडी कोठडी

मनीष सिसोदियांच्या अडचणीत वाढ, 17 मार्चपर्यंत ईडी कोठडी

नवी दिल्ली : दारू घोटाळ्यात अटक करण्यात आलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या अडचणीमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळते आहे. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने मनीष सिसोदिया यांना आता 17 मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. सिसोदिया यांच्या चौकशीसाठी ईडीने न्यायालयाकडे 10 दिवसांची कोठडी मागितली, परंतु न्यायालयाने केवळ 7 दिवसांची कोठडी मंजूर केली. मात्र यामुळे सिसोदीया यांच्या अडचणीत भर पडल्याचे दिसून आले आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने गुरुवारी अबकारी प्रकरणात मनीष सिसोदिया यांना अटक केली होती. त्यानंतर ईडीने त्यांना आज (10 मार्च) रोजी न्यायालयात हजर केले. सिसोदिया यांना आधी आठवडाभर सीबीआय कोठडीत राहावे लागले. यानंतर त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देखील सुनावण्यात आली होती.

Mumbai News : गोरेगाव फिल्मसिटीत भीषण आग; काही कलाकार अडकले, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू

तिहार तुरुंगात सिसोदीया यांची प्रदीर्घ चौकशी झाल्यानंतर ईडीने गुरुवारी सिसोदिया यांना अटक केली. आज त्यांना राऊस अॅव्हेन्यू कोर्टात विशेष न्यायाधीश एम के नागपाल यांच्यासमोर हजर करण्यात आले. ईडीने न्यायालयाला सांगितले की, दारू घोटाळ्याच्या तपासात सिसोदिया याच्यांकडून अपेक्षित सहकार्य लाभत नाही आहे. त्यामुळे त्यांची रिमांडवर चौकशी करणे आवश्यक आहे. यासाठी ईडीने न्यायालयाला सांगितले की सिसोदिया यांच्या चौकशीसाठी 10 दिवसांची कोठडी मिळावी अशी मागणी देखील केली होती. मात्र न्यायालयाने केवळ 7 दिवसांची कोठडी मंजुर केली आहे.

H3N2 व्हायरसचे संकट मार्च अखेरीस कमी होईल, केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

सीबीआय केसमध्ये सुनावणी टळली
मनीष सिसोदीया यांच्या अडचणीत दिवसेंदिवस भर पडत आहे. सीबीआय प्रकरणात न्यायालयाने मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली आहे. राऊस अॅव्हेन्यू कोर्ट आता 21 मार्चला यावर सुनावणी करणार आहे. याशिवाय ईडीच्या कोठडीची मागणी लक्षात घेऊन न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. सिसोदिया यांना 26 फेब्रुवारी रोजी सीबीआयने कथित भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक केली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube