आत्ता आमच्याकडे 44 प्लसचा आकडा आहे, आगे, आगे, देखो हा आकडा वाढणारच असल्याचा विश्वास राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रतोद आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आमदार पाटील पहिल्यांदाच जळगावात आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
WC Qualifiers 2023: नेदरलँड्स विश्वचषकासाठी पात्र, स्कॉटलंडला नमवून केला अंतिम दहामध्ये प्रवेश
पुढे बोलताना पाटील म्हणाले, याआधी आम्ही सत्तेत नसताना जळगाव जिल्ह्याच्या अनेक प्रश्नांसाठी आवाज उठवला आहे. तेच प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सत्तेत आलो आहोत. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की मला मंत्रिपद मिळेल, पण अजितदादांवर निष्णांत प्रेम केल्याने आज मी मंत्रिपदाची शपथ घेतली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
मोठ्या साहेबांची जिरवण्याच्या नादात भाजपची तर जिरणार नाही ना? कार्यकर्त्यांचं फडणवीसांना पत्र
तसेच सध्या आम्ही सत्तेत बसलो आहोत. आमच्याकडे आत्ता 44 पेक्षा अधिक आमदार आहेत.आगामी काळात हा आकडा वाढणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
Maharashtra Politics : पवारांच्या राजकारणापासून परिवारही सुटला नाही; बावनकुळेंचं टीकास्त्र
दरम्यान, सत्तेत आल्यानंतर आपण जनतेच्या विकासासाठी सत्तेचा वापर केला पाहिजे, आधी अधिकार नव्हते आता अधिकार प्राप्त झाले आहेत. त्यामुळे दोन्ही मंत्र्यांना सोबत घेऊन जळगावचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचं आश्वासनच त्यांनी दिलं आहे.
अजित पवारांसोबत शपथविधीदरम्यान, अनिल पाटीलही उपस्थित होते. राजभवनात अजित पवारांसोबत अनिल पाटील यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीत संघर्ष सुरु झाल्याचं पाहायला मिळालं. अजित पवार यांनी आपल्या गटाच्या प्रदेशाध्यक्षपदी सुनिल तटकरे तर प्रतोदपदी अनिल पाटील यांची नियुक्ती केली आहे.