Download App

अंजली दमानियांनी घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट; पुरावे पाहून अजितदादांनाही धक्का, म्हणाले, ‘आता उद्याचं CM…’

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा राजीनामा घेतला नाही, तर मी कोर्टात जाईन असा इशारा अंजली दमानिया यांनी अजित पवारांना दिला.

  • Written By: Last Updated:

Anjali Damania Meet Ajit Pawar : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणी सतत आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी करत सर्व पुरावेही अजित पवारांसमोर सादर केले. या भेटीत दमानिया यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा राजीनामा घेतला नाही, तर मी कोर्टात जाईन असा इशाराही  दिला.

चिनी DeepSeek AI गेमचेंजर ठरणार ? अमेरिकेची मक्तेदारी असलेल्या टेक कंपन्या धोक्यात

बैठकीनंतर अंजली दमानिया यांनी अजित पवारांसोबत झालेल्या चर्चेची माहिती माध्यमांच्या प्रतिनिधींना दिली. त्या म्हणाल्या, मी त्यांच्याशी सुमारे २५ ते ३० मिनिटे चर्चा केली. त्याचं म्हणणं होतं की, बीडमध्ये झालेली घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे. त्याचं मी कुठंही समर्थन करत नाही. मग माझंही तेच म्हणणं होतं की, तरीही तुम्ही मुंडेंचा राजीनामा का घेत नाही? मी माझ्याकडी सर्व पुरावे त्यांना दाखवले. कशाप्रकारे धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराडचे एकत्रित बिझनेस आहेत. आताा उद्या दुपारी १२ वाजता त्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आहे, मी जे पुरावे त्यांना दाखवले, कागदपत्रे दिली, त्या अनुषंगाने ते मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत, असं दमानिया यांनी सांगितलं.

Jio Coin देणार का Bitcoin ला टक्कर? एका क्लीकवर जाणून घ्या कसा होणार फायदा 

गृहमंत्रालयाने मंत्री आणि आमदारांसाठी जे डायरेक्शन दिलं आहेत, तेही मी अजित पवारांना दाखवलं. त्यामुळं हे सर्व गंभीर आहे, असंही त्यांनी म्हटलं.

अजित पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील का, असा सवाल दमानिया यांना विचारण्यात आला असता त्या म्हणाल्या की, संतोष देशमुख यांच्यासोबत जे घडलं ते पुन्हा महाराष्ट्रात घडू नये, असे त्यांचेही म्हणणे आहे. त्यामुळे, मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्यानंतर ते धनजंय मुंडेंचा राजीनामा घेतील, असा विश्वास दमानिया यांनी व्यक्त केला. ज्या पद्धतीने त्यांनी माझ्याकडील बीडमधील दहशतीचे सर्व पुरावे, रील्स हे सगळं बघून घेतलं, समजून घेतलं, जे त्यांना आतापर्यंत माहिती नव्हतं. आज गंभीरपणे त्यांनी सगळं बघितलं, त्यामुळं ते नक्कीच राजीमान्याबद्दल विचार करतील, असं दमानिया यांन म्हटलं.

जर त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय न घेतल्यास ते योग्य होणार नाही. राजीनाम्याबाबत निर्णय न झाल्यास मी सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे सुमोटो दाखल करून संबंधित आमदाराची आमदारकी रद्द कऱण्याची मागणी करणार, असंही दमानिया यांनी म्हटलं.

follow us