Anjali Damania on Rupali Chakankar Resignation also Criticize Sunetra Pawar : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. विरोधकांकडून सातत्याने राजीनाम्याची मागणी होत असतानाच चाकणकर यांनी राजीनाम्याचे पत्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे सुपूर्द केला. दरम्यान चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणावर चाकणकर यांच्यासह सुनेत्रा पवार आणि खरात सोबत फोटो असणाऱ्या सर्वच नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.
“तारा” चा नवा प्रोमो आऊट; प्रेमाचे उत्कट क्षण की नियती कायमची बदलणार तारा आणि युवराजची कहाणी?
या वेळी बोलताना दमानिया म्हणाले की, शुक्रवारी रात्री रुपाली चाकणकर यांनी त्यांचा राजीनामा सुनेत्रा पवार यांच्याकडे दिला. खरतर महिला आयोग हा महिलांच्या सुरक्षेसाठी असतो. पण स्वार्थासाठी राजकीय मंडळी आणि खरात सारख्या मंडळींना आधार देतात तेव्हा महिलांचा आधार जातो. अशाच प्रकारच्या माझ्याकडे आलेल्या पाच ते सहा केसेसमध्ये महिला आयोगाने काहीच केले नाही. तसेच चाकणकरांचा राजीनामा 24 तासांत झाला म्हणून ठीक नाही तर आम्ही आंदोलन करणार होतो.
मोठेमोठे गार केले गंमतमधी; चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर सुषमा अंधारेंचं व्हॉट्सॲप स्टेटस चर्चेत
दुसरीकडे सुनील तटकरे यांची बॉडी लँग्वेज बघितली. ते माध्यामांच्या प्रश्नांपासून पळ काढत होते. तुम्ही पाळलात तरी आम्ही लढू आणि सोडणार नाही. हा पहिला टप्पा आहे. जेवढे राजकारणी खरात कडून ओश नो जल घ्यायचे त्यांची नावे बाहेर आली पाहणे महाराष्ट्राच्या राजकारणाला साफ करण्याची गरज आहे. त्यामुळे रुपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. तसेच मुख्यमंत्र्यांचे आभार मानते की, त्यांनी तात्काळ चाकणकरांना राजीनामा देण्याचे निर्देश देत महिलांवर उपकार केले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी महिला आयोग आणि राजकारण वेगळं व्हावं महिला अधिकारी ज्या येतील त्या ips अधिकारी किंवा निवृत्त न्यायमूर्ती असायला पाहिजे.
साताऱ्यात भाजप विरुद्ध शिवसेना-राष्ट्रवादी संघर्षाची ठिणगी; जिल्हा परिषद निकालानंतर राजकारण तापलं
चाकणकरांचं काय करायचं? तो पक्षाचा निर्णय आहे सुनेत्रा पवार्यांनी घ्यावा. तसेच त्यांनी मात्र एक महिला आणि राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री या तीन दिवस फक्त बघत राहिल्या. त्यांनी कुठलंही पाऊलं उचललं नाही. कळस झाल्यानंतर त्यांनी तो राजीनामा स्वीकारला. तसेच तो राजीनामा स्वीकारताना सुनेत्रा पवार यांचा चेहरा गंभीर होता. पण रुपाली चाकणकर मॉडेलिंग करण्यासाठी उभ्या होत्या.
‘राजीनामा देताना त्यांचा माज उतरलेला नाही!’ वडेट्टीवारांचा रुपाली चाकणकरांवर हल्लाबोल
त्यामुळे जे राजकारणी गाड्या पाठवायचे जल घेण्यासाठी या सगळ्यांची नावे बाहेर आले पाहिजे. विकास दिवटे आत्महत्या केलेल्या माणसाची केस बाहेर काढा. अनामिका कापली किंवा नाही ते त्यांनी आणि सुषमा अंधारे यांनी बघावं. पण त्यांचे फोटो प्रचंड आले होते. कितीही अब्रू नुकसान दाव्याचा खटला टाका मी घाबरत नाही. अंधश्रद्धा वाढत आहेत त्यांना राजकारणी का खतपाणी घालतात? आजी माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नेहमीच तिथे जात होते.
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा? रुपाली चाकणकर अशोक खरात प्रकरणामुळे अडचणीत
काळाराम महाराजांचे म्हणणे होते की मंत्र चुकीचे होते. केसरकर, चंद्रकांत पाटील, धनंजय मुंडे, सुनील तटकरे या सगळ्यांचे फोटो पाहिले आहे. जयंत पाटील यांनी त्यांच्या काळात धरणाचे पाणी आरक्षित केले पहिले हे आरक्षण काढून टाका. जयंत पाटील यांचं नाव अनेक वेळा समोर येत आहे. रुपाली चाकणकर यांना कोण वाचवत असेल तर सुनील तटकरे. त्यानं कोणी काही बोललं की चिडचिड करण ही सगळ सुरू आहे.
प्राइम व्हिडिओच्या मंचावर TVFचा दबदबा: 6 वेब सिरीज आणि 2 चित्रपटांची मोठी घोषणा
पदाची गरिमा खराब केली. महिला आयोगाच्या अध्यक्षांनी त्या पदाचा गरिमा राखला पाहिजे. पांडुरंगच दर्शन इकडे येऊन घ्या. संपदा मुंडे यांच्या प्रकरणात तुम्ही तिच्यावर शिंथोडे उडवले तेव्हाच तुमचा राजीनामा घ्यायला हवा होता. पीडित महिलांची प्रकरणी दाबली आणि विकासाची आत्महत्या केस बंद केली तर त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल झालाच पाहिजे. दुपारनंतर सदानंद दाते यांना पत्र दिलं. उलटा चोर कोतवाल को डाटे. दीपक केसरकर यांची पण काही करू फक्त पुरेसे पुरावे मिळू दे.
