“तारा” चा नवा प्रोमो आऊट; प्रेमाचे उत्कट क्षण की नियती कायमची बदलणार तारा आणि युवराजची कहाणी?

युवराजचा साखरपुडा चांदनीच्या भाची सैना हिच्यासोबत ‘रोका’ समारंभात होत आहे आणि तारा हे सर्व पाहून धक्का बसल्यासारखी व व्यथित होते.

  • Written By: Published:
Untitled Design (20)

New promo of “Tara” out : स्टार प्लसवरील ‘तारा’ ही मालिका उत्कंठावर्धक आणि थरारक कथानकामुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ठरत आहे. मनाला भिडणाऱ्या प्रेमकथेमुळे या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या शोमध्ये कनिका कपूर तारा आणि क्रुशल आहुजा युवराज यांच्या भूमिकेत दिसणार आहे. अनेक वर्षांत फुलत गेलेल्या त्यांच्या नात्याची ही कथा आहे. तारा ही युवराजच्या घरातील काम करणाऱ्या व्यक्तीची नात आहे तर युवराज हा मोठ्या संपत्तीचा वारसदार आहे. लहानपणापासूनचे मित्र असलेले हे दोघे पुढे जाऊन एकमेकांच्या प्रेमात पडतात.

मात्र त्यांच्या सामाजिक फरकांमुळे आणि परिस्थितीमुळे युवराज आपल्या कुटुंबासमोर आपल्या भावना व्यक्त करण्यास कचरतो. आता निर्मात्यांनी एक नवा प्रोमो रिलीज केला असून जो कथेला एक वेगळं वळण देतो. या प्रोमोमध्ये आपल्याला युवराज आणि ताराच्या भूतकाळाची झलक पाहायला मिळते. जिथे मंदिरात गेल्यावर युवराज ताऱ्याच्या कपाळावर सिंदूर लावताना दिसतो. हा क्षण त्याच्या अबोल प्रेमाची जाणीव करून देतो.

पण सध्याच्या कथानकात युवराजचा साखरपुडा चांदनीच्या भाची सैना हिच्यासोबत ‘रोका’ समारंभात होत आहे आणि तारा हे सर्व पाहून धक्का बसल्यासारखी व व्यथित होते. ‘अजीब दास्तान है ये’ या गाण्याद्वारे तारा आपल्या भावना व्यक्त करताना दिसते. अचानक घडलेल्या या बदलामुळे दोघेही गोंधळलेले आहेत आणि एकमेकांबद्दलच्या आपल्या भावनांना समजून घेण्यात अपयशी ठरत आहेत.

युवराजच्या या अनपेक्षित बदलामुळे प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत तो आपल्या कुटुंबासमोर तारा बद्दलच प्रेम कबूल करेल का की त्यांच्या नात्यात आणखी दुरावा येणार? वाढत जाणाऱ्या भावना आणि तणावामुळे ही प्रेमकथा पुढे कोणते वळण घेणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. पाहा ‘तारा’ या सोमवारपासून संध्याकाळी ७:३० वाजता, फक्त स्टार प्लस वर !

Tags

follow us