Anjali Damania on Chhagan Bhujbal : एकीकडे आज छगन भुजबळ यांनी (Chhagan Bhujbal) मंत्रिपदाची शपथ घेतली आहे, त्यामुळे ओबीसी समाजात आनंदाची लाट आहे. तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा मात्र तिळपापड झाल्याचं पाहायला मिळालं. भुजबळांच्या शपथविधिनंतर अंजली दमानिया यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यावर त्यांनी महाराष्ट्राचं राजकारण आणि भ्रष्ट्राचार यावर निशाणा साधला आहे. दमानिया ( Anjali Damania) नेमकं काय म्हणाल्या त्या सविस्तर पाहू या.
भुजबळांच्या शपथविधिनंतर दमानिया यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय की, मला तर खरंच वाटतंय की, राजकारणात यांना नाईलाज आहे. त्यांना चांगली माणसं मिळत नाही. एक भ्रष्टाचारी मंत्री गेल्यानंतर लगेच दुसरा भ्रष्ट्राचारी मंत्री आणण्याची काय (Maharashtra Politics) गरज आहे? मला खरंच कळत नाही. अशा माणसाला आणून लोकांच्या डोक्यावर थोपवलं जातंय. माझ्यासारख्या लोकांना याच्यात एक संदेश आहे. तुम्ही लढून काहीच फरक पडणार नाही. मी जसं सिंचन घोटाळ्याविरूद्ध लढले. भुजबळांविरूद्ध लढले, धनंजय मुंडेंविरूद्ध लढले, खडसेंविरोधात लढले.
छगन भुजबळ मंगळवारी सकाळी 10 वाजता राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेणार ?
वाह फडणवीस वाह !
म्हणजे एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री येणार? जनता अशीच भरडली जमणा? की हा माझ्यासारख्या भ्रष्टाचार विरोधी लढणाऱ्यांना संदेश आहे, की तुम्ही आमच काहीच वाकड करू शकत नाही ?
असा… pic.twitter.com/dLj7MN79JE
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) May 20, 2025
कदाचित याच्यातून हे आम्हाला संदेश देत असतील, की तुम्ही लढून काहीच फरक पडणार नाही. तुम्ही लढा, जे आम्हाला करायचं ते करीत राहणार, हाच संदेश याच्यातून देताना दिसत आहेत. म्हणून मी आज संध्याकाळपर्यंत विचार करणार (Chhagan Bhujbal Oath Ceremony) आहे की, यापुढे महाराष्ट्राच्या भ्रष्टाचाराविरूद्ध लढायचं की नाही, हे मी आता ठरवणार आहे, असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.
जहाँ नहीं चैना ते कॅबिनेट; भुजबळांच्या कमबॅकचं हिडन सिक्रेट’; समीकरण अन् राजकारण नेमकं कसं?
छगन भुजबळ यांनी आज सकाळी 10 वाजता राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या संतापल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यांनी म्हटलंय की, एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री येणार? हा माझ्यासारख्या भ्रष्टाचार विरोधी लढणाऱ्यांना संदेश आहे, की तुम्ही आमचं काहीचं वाकड करू शकत नाही ? असा काय नाईलाज आहे ? की सभ्य माणसं मिळत नाहीत राजकारणात? असे सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय.
ओबीसींच्या प्रश्नांवर भूमिका घेणार नसाल… तर गाठ ओबीसी चळवळीशी, लक्ष्मण हाकेंचा इशारा नेमका कोणाला?
हो, हेच भुजबळ जेव्हा जेलमध्ये होते, तेव्हा एक अगदी बिचाऱ्यासारखा फोटो माध्यमांमध्ये दाखवला जायचा. तेव्हा छातीत कळ यायची. मग आता ठणठणीत ? किळस वाटतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची. खालच्या घोषणा आठवतात ? ‘भ्रष्टाचारीयो पर कारवाई के लिए, अब की बार 400 पार’, ‘भ्रष्टाचार के खिलाफ मोदी सरकार के बडे कदम’
हा आहे का तो बडा कदम? ही ती कारवाई? असे सवाल देखील अंजली दमानिया यांनी उपस्थित केले आहेत.