ओबीसींच्या प्रश्नांवर भूमिका घेणार नसाल… तर गाठ ओबीसी चळवळीशी, हाकेंचा इशारा नेमका कोणाला?

Laxman Hake Reaction On Chhagan Bhujbal Oath Ceremony : अखेर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्यामुळे जागा रिक्त झाली होती. आज छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर दुसरीकडे छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात एन्ट्री झाल्यामुळे ओबीसी समाजात आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण आहे. यावर ओबीसी (OBC) नेते लक्ष्मण हाके यांची (Laxman Hake) प्रतिक्रिया देखील समोर आली आहे.
महाराष्ट्रात अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने छगन भुजबळ यांना थोडं उशीरा का होईना, स्थान दिलंय. त्याबद्दल त्यांचं स्वागत करतो. ओबीसींच्या दृष्टिकोनातून छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश आवश्यक (Maharashtra Politics) होता. परंतु ओबीसींचं आरक्षण अन् आरक्षणामधील घुसखोरी हे खरं तर ओबीसी, ओबीसी नेते यांच्यासमोर येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये एक आव्हानाचे प्रश्न आहेत. छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे निश्चित या लढाईला बळ मिळणार आहे.
जहाँ नहीं चैना ते कॅबिनेट; भुजबळांच्या कमबॅकचं हिडन सिक्रेट’; समीकरण अन् राजकारण नेमकं कसं?
हाके यांनी म्हटलंय की, याच्याही पलीकडे जावून भुजबळ साहेबांचा मंत्रिमंडळात समावेश ये तो सिर्फ झांकी है, पुढे जावून सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील अभी बाकी है, असं सूचक वक्तव्य देखील लक्ष्मण हाके यांनी केलंय.
चीनच्या सापळ्यात अफगाणिस्तान! भारताला धक्का देत खेळली मोठी चाल; बैठकीचा गुप्त अजेंडा समोर
अजित पवारांच्या राष्ट्रवादीने उशिरा का होईना छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान दिले, त्याचं स्वागत करतो. ओबीसींच्या दृष्टिकोनातून छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळातील समावेश आवश्यक होता. मात्र ओबीसींचे आरक्षण आणि आरक्षणामधील घुसखोरी हे ओबीसी आणि ओबीसी नेत्यांसमोरील येत्या निवडणुकीमधील अडचणीचे प्रश्न आहेत. छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाने या लढाईला बळ मिळणार आहे. छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील या सगळ्यांना सदिच्छा आहे. पण, ओबीसींच्या प्रश्नांवर भूमिका घेणार नसाल तर गाठ ओबीसी चळवळीशी आहे, हे लक्षात ठेवा असं देखील लक्ष्मण हाकेंनी म्हटलं आहे.