पुन्हा एकदा भुजबळ पर्व! छगन भुजबळांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

पुन्हा एकदा भुजबळ पर्व! छगन भुजबळांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

NCP Leader Chhagan Bhujbal Takes Oath As Minister : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात पुन्हा एकदा भुजबळांचं कमबॅक झालंय. आज राजभवनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी (Chhagan Bhujbal) मंत्रि‍पदाची (Maharashtra Politics) शपथ घेतली. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज भुजबळ यांना शपथ दिली आहे.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यामुळे जागा रिक्त झाली होती. त्या जागेवर आता भुजबळ यांना स्थान देण्यात ( Chhagan Bhujbal Takes Oath As Minister) आलंय. छगन भुजबळ यांना पुन्हा अन्न आणि नागरी पुरवठा खाते देण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तर तब्बल तिसऱ्यांदा छगन भुजबळ यांच्याकडे खात्याची सूत्र सोपवली जाणार आहेत.

Home Loan : होम लोन घेताय मग आधी ‘या’ गोष्टी कराच; फायदाच होईल

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असून देखील छगन भुजबळ यांना महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं नव्हतं. त्यामुळे भुजबळ नाराज असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु होती.
मंत्रिमंडळात डावललं गेलं, मंत्रिपद मिळालं नाही म्हणून त्यांनी अनेकवेळा व्यक्त केली होती. अजित पवारांवर देखील त्यांनी थेट टीका केली होती. आता मंत्रिपद मिळाल्यानंतर भुजबळांची नाराजी दूर होण्याची शक्यता आहे.

Nashik : पोलिसांना कुख्यात आरोपींसोबत जेवण भोवलं; पोलिस आयुक्तांनी थेट घरचा रस्ता दाखवला

छगन भुजबळांनी अजित पवारांनी मंत्रिमंडळात डावलल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती. यावेळी संयम राखा, असा सल्ला देवेंद्र फडणवीसांनी छगन भुजबळ यांना दिला होती. मागील सरकारमध्ये देखील छगन भुजबळ यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी होती. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर हे खातं मुंडेंकडे सोपवण्यात आलं होतं. त्यामुळे हे खातं आता पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्याकडे सोपवलं जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube