Nashik : पोलिसांना कुख्यात आरोपींसोबत जेवण भोवलं; पोलिस आयुक्तांनी थेट घरचा रस्ता दाखवला

Nashik : पोलिसांना कुख्यात आरोपींसोबत जेवण भोवलं; पोलिस आयुक्तांनी थेट घरचा रस्ता दाखवला

Nashik News : नाशिकमध्ये खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपींना जेलमध्ये नेत असताना एका हॉटेलमध्ये केलेलं जेवण तीन पोलिसांना चांगलंच भोवलंय. एका हॉटेलमध्ये तीन पोलिसांनी आरोपींसोबत जेवण केलं होतं. या घटनेची माहिती नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (Sandip Karnik) यांना समजताच आयुक्तांनी पोलिस कर्मचाऱ्यांनी थेट घरचा रस्ता दाखवलायं. तीन पोलिस कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलंय.

बीडच्या गुन्हेगारीवर सुरेश धसांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, बिंदूनामावलीचाही मुद्दा मांडणार, पोलिसांवरही संशय

नेमकं काय घडलं?
पोलिस सुत्रांच्या माहितीनुसार शनिवार 17 मे रोजी एका खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी प्रफुल्ल पाटील आणि कुंदल घडे यांना न्यायालयीन कामकाजासाठी जेलमधून न्यायालयात नेण्यात आले होते. न्यायालयीन कामकाज उरकल्यानंतर दुपारी तीन वाजता रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये आरोपी आणि पोलिसांनी पार्टीचं नियोजन करत होते.

खळबळजनक! पहलगाम हल्ल्यानंतर दिल्लीत केक अन् सेलीब्रेशन…, ज्योती मल्होत्राचा ‘त्याच’ अधिकाऱ्यासोबत फोटो

पोलिस आणि आरोपींची जेवणाची पार्टी सुरु असतानाच एका सुज्ञ नागरिकाने नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांना या प्रकाराची माहिती दिली. पोलिस आयुक्तांना माहिती समजताच त्यांनी प्रकरणाची दखल घेण्याचे आदेश पोलिसांना दिले. खुद्द पोलिसांनी हॉटेलमध्ये जात आरोपींसोबत पोलिस कर्मचारी जेवण करत असल्याची खातरजमा केली. यावेळी पोलिसांनी छापा टाकला असता पोलिस अंमलदार संशयित आरोपींसोबत जेवण करत असताना आढळून आले.

Video : या घटनेत कुठंही जाती-धर्माचा संबंध नाही; शिवराज दिवटेची धनंजय मुंडेंनी घेतली भेट, काय म्हणाले?

या प्रकरणाी चौकशी हा अहवाल पोलिस आयुक्तांकडे पाठवण्यात आला होता. पोलिस पथकाचा अहवाल समोर येताच पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आपल्या कारवाईचा बडगा या तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर उगारला आहे. आरोपींसोबत पार्टी केल्याप्रकरणी पोलिस आयुक्तांनी या तीन पोलिस कर्मचाऱ्यांना थेट घरचा रस्ता दाखवला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube