गुन्हे शोध पथकांमध्ये आता महिला पोलिस; नाशिकचे आयुक्त संदीप कर्णिकांचा धडकेबाज निर्णय

  • Written By: Published:
गुन्हे शोध पथकांमध्ये आता महिला पोलिस; नाशिकचे आयुक्त संदीप कर्णिकांचा धडकेबाज निर्णय

Nashik Police Detection Branch Squads included Women Police : पोलिस दलामध्ये महिला पोलिसांना महत्त्वाचे पदे, जबाबदारी दिली जात नाही. पोलिस अधिकारी असू की महिला कर्मचारी यांना कायम दुय्यम जबाबदारी दिली जाते. संपूर्ण महाराष्ट्रात असेच चित्र आहे. पण नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (sandeep karnik) यांनी एक धाडसी निर्णय घेतला आहे. नाशिक शहरातील (Nashik City) पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकांमध्ये महिला अंमलदारांचा समावेश करण्यात आला आहे. चौदा महिला पोलिसांची गुन्हे शोध पथकात (डीबी) नियुक्तीचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत.


शिर्डी लोकसभेची लढाई धनशक्ती विरुध्द जनशक्ती; उत्कर्षा रूपवतेंचा आजी-माजींवर हल्लाबोल

पोलिस आयुक्तालयातील तेरा पोलिस ठाणे आणि एका पोलिस चौकीच्या गुन्हे शोध पथकामध्ये महिला अंमलदारांना नियुक्ती दिली आहे. पोलिस ठाण्यामध्ये गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी स्वतंत्र गुन्हे शोध पथक असते. या पथकामध्ये शक्यतो पुरुष अंमलदारांचा समावेश असतो. या पथकाकडून पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्यांचा तपास करणे, गुन्हेगारांचा शोध घेणे, अवैध धंद्याविरोधात कारवाई केली जाते. नाशिक शहरातील तेरा पोलिस ठाणे व एक पोलिस चौकीत गुन्हे शोध पथक आहे. परंतु या पथकात केवळ पुरुष अंमलदार आहेत. त्यामुळे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी चौदा महिला अंमलदारांवर गुन्हे शोध पथकात जबाबदारी देण्यात आली आहे.

ब्रेकिंग न्यूज: मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयाला मोठी आग, कशाने लागली आग ?

गंभीर गुन्हे करणाऱ्यांवर लक्ष ठेवणे, पोलिस खबऱ्यांचे नेटवर्कची व्यवस्था पाहणे, गुन्हा घडलेल्या घटनास्थळी भेट देऊन पाहणी करणे, गुन्ह्यांची पद्धत, गुन्हाचा तपास कसा पध्दतीने करायचा, अशी जबाबदारी या महिला अंमलदारांवर असणार आहे. याबाबत पोलिस आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले, महिला पोलिस अंमलदारांनाही महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्याची संधी मिळाली पाहिजे. त्यामुळे गुन्हे शोध पथकांत महिला अंमलदारांची नियुक्ती केलीय. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतील.

जबाबदारी कोणती ?
सातत्याने गंभीर गुन्हे करणाऱ्यांवर लक्ष ठेवणे
पोलिस खबऱ्यांचे नेटवर्क पाहणे
गुन्हा घडलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करणे
गुन्ह्यांची पद्धत शोधून, आरोपींना अटक करणे

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज