Swine Flu In Nashik: राज्यात नवीन संकट? नाशिक जिल्ह्यात आढळले स्वाईन फ्लूचे रुग्ण, एकाचा मृत्यू

Swine Flu In Nashik: राज्यात नवीन संकट? नाशिक जिल्ह्यात आढळले स्वाईन फ्लूचे रुग्ण, एकाचा मृत्यू

Swine Flu In Nashik: एकीकडे राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस (Unseasonal Rains) होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यासह काही भागात होत असणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे. अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे (Rabi Crops) मोठे नुकसान झाले आहे.

तर दुसरीकडे आता राज्यात पुन्हा एकदा स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहे. यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घेण्यचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे (Swine Flu) 3 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी एकाच मुत्यू झाला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, काही दिवसापूर्वी सिन्नरमधील एका महिलेला स्वाईन फ्लूची लागण झाली होती. या महिलेचा मुत्यू झाला आहे तर नाशिक शहरात 2 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहे. सतत बदलत असणाऱ्या वातावरणामुळे सध्या नाशिक जिल्ह्यात तापाची साथ सुरु आहे. यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घेण्यचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

स्वाईन फ्लू हा श्वसनाचा रोग

इन्फ्लूएंझा व्हायरसच्या प्रकारामुळे H1N1 म्हणजेच स्वाईन फ्लूची लागण होते. डुकरांनाही अशाच प्रकारच्या फ्लूची लागण होते त्यामुळे याला स्वाइन फ्लू म्हणतात. H1N1 या विषाणूमुळे डुकरांमध्ये फुफ्फुसाचा (श्वसन) रोग होतो. तसेच मानवालाही H1N1 या विषाणूमुळे श्वसन संसर्ग होतो.

स्वाईन फ्लू लक्षणे

स्वाईन फ्लूची लक्षणे ही तापासारखी असतात. यात ताप, थंडी, खोकला, घसा खवखवणे, शरीरात किंवा स्नायूंमध्ये वेदना, डोकेदुखी, थकवा, श्वास घेण्यास त्रास होणे, पुरळ या लक्षणांचा समावेश आहे. स्वाईन फ्लू व्हायरसमुळे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरतो किंवा जर तुम्ही एखाद्या दूषित भागाला स्पर्श केला आणि नंतर हाताने तुमच्या तोंडाला, नाकाला किंवा डोळ्यांना स्पर्श केला तर तुम्हाला स्वाईन फ्लूची लागण होण्याची शक्यता असते . व्हायरसच्या संपर्कात आल्यानंतर 3 ते 5 दिवसांनी लक्षणे दिसू लागतात.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube