Download App

भ्रष्टाचाऱ्यांना सोबत घेणं हे दुर्दैवच, अजितदादांवरून अण्णांचा भाजपवर निशाणा

  • Written By: Last Updated:

Anna Hazare Target On BJP : मणिपूरमधील घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. या घटनेचा निषेध करत केंद्र सरकावर टीकेची झोड उठलेली असताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही संताप व्यक्त केला. मणिपूरमधील घटना निंदनीय असून यातील नराधमांना फासावर लटकावलं पाहिजे. या घटनेसंबंधी केंद्र सरकार काहीच बोलत नाही, हे आणखी चिंताजनक आहे, अशा शब्दांत अण्णांनी सरकारला फटकारले होते. त्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अण्णांकडे भ्रष्टाचाऱ्यांविरुद्ध रणशिंग फुंका अशी मागणी केली होती. (Anna Hazare targets BJP for taking Ajit Pawar along)

त्यावर आता जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी भाष्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडून अजित पवार यांना भाजपने सरकारमध्ये सामील करून घेतले आहे. यावरून अण्णांनी भाजपवर निशाणा साधला आहे. आण्णा म्हणतात भ्रष्टाचाऱ्यांना सोबत घेणं हे दुर्दैवच आहे. ज्या लोकांचा तुम्ही आयुष्यभर विरोध केला त्याच लोकांना तुम्ही आज सोबत घेत असाल तर हे लोकशाहीच्या दृष्टीने चुकीचे आहे. हे लोक भ्रष्ट आहेत, यांना शिक्षा झाली हे सर्व माहित असून देखील तुम्ही त्यांना बरोबर घेऊन चालत असाल तर हे खूप दुर्दैवी आहे.

या देशासाठी 1857 ते 1947 अनेक हुतात्म्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान केले आहे. परंतु तुम्ही लोकांनी ते स्वतंत्र कुठे नेहून ठेवले आहे. असा सवाल यावेळी अण्णांनी भाजपला केला. अशा गुंड, भ्रष्ट लोकांनाबरोबर घेऊन चाललात हे आमचं दुर्दैव आहे. अशा शब्दात अण्णांनी सरकारला सुनावले.

‘महाराष्ट्राच्या कुटुंबप्रमुखांचा आवाज’, उद्धव ठाकरेंची वर्षातली दुसरी स्फोटक मुलाखत…

राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत अण्णा हजारे यांना भाजपाच्या भ्रष्टाचाऱ्यांविरुद्ध आंदोलन करण्याचं आवाहन केलं होतं. महाराष्ट्रात ज्यांच्यावर भाजपने पुराव्यांसह भ्रष्टाचाराचे आरोप केले ते सगळं लोक शपथ घेऊन भाजपच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून सहभागी झाले आहेत. अण्णा हजारे यांनी आधी यावर आवाज उठवायला हवा. अजित पवार असतील, हसन मुश्रीफ असतील किंवा शिवसेनेतून बेईमानी करून जे गेले आणि आता मंत्री असतील या सगळ्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. अण्णा हजारेंनी या विषयावर भूमिका व्यक्त करुन एका आंदोलनाची घोषणा केली पाहिजे आम्ही सगळे त्यांच्याबरोबर आहोत.

Tags

follow us