‘महाराष्ट्राच्या कुटुंबप्रमुखांचा आवाज’, उद्धव ठाकरेंची वर्षातली दुसरी स्फोटक मुलाखत…
राज्यातल्या राजकीय उलापालथीनंतर आता राज्यात शिंदे-फडणवीस-पवार सरकार स्थापन झालं आहे. मागील एक वर्षांत अनपेक्षित राजकीय घडामोडी घडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सामनाचे संपादक आणि खासदार संजय राऊत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची स्फोटक मुलाखत घेणार आहेत. या मुलाखतीचा प्रोमो शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन प्रसिद्ध करण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या कुटुंबप्रमुखांचा आवाज, 'आवाज कुणाचा' वर!
लवकरच….#AawazKunacha pic.twitter.com/J8eow9jQML
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) July 23, 2023
ट्विटमध्ये ‘महाराष्ट्राच्या कुटुंबप्रमुखांचा आवाज,’आवाज कुणाचा’ वर! लवकरच… असं कॅप्शनही देण्यात आलं आहे. प्रोमोमध्येही आवाज कुणाचा, वर्षातील सर्वांत मोठा स्फोटक आणि थेट भाग लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचं सूचवण्यात आलं आहे. पुढे उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत बसलेले दिसत असून ते मुलाखत घेत असल्याचं दिसून येत आहे. तर शेवटी स्व. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा फोटो दर्शवण्यात आला आहे.
हुंड्यासाठी पत्नीचा छळ! पतीच्या अपिलावर जिल्हा सत्र न्यायालयाकडून शिक्षा कायम…
उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळून वर्ष झालं असून या वर्षभरात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंच्या गटाकडे गेले आहे. मात्र, खरी आमचीच शिवसेना असा दावा ठाकरे गटाकडून वारंवार केला जात आहे. याच राजकीय घडामोडी सुरु असताना आता महाविकास आघाडीमधला मोठा पक्ष समजला जाणारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आपल्या समर्थकांना घेऊन सत्तेत गेले आहेत. त्यामुळे आता शिंदेचं मुख्यमंत्री जाणार असल्याच्याही चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, याचं पार्श्वभुमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांचं आजच्या राजकीय घडामोडींविषयीचं रोखठोक मत काय? यावर स्फोटक मुलाखत घेणार आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत घेणार आहेत. राज्यात सध्या मोठ्या भूकंपाची जोरदार सुरु आहे, अशातच आता उद्धव ठाकरेंची स्फोटक मुलाखत लवकरच होणार असल्याचा दावा शिवेसेनेकडून करण्यात आला आहे.