हुंड्यासाठी पत्नीचा छळ! पतीच्या अपिलावर जिल्हा सत्र न्यायालयाकडून शिक्षा कायम…

हुंड्यासाठी पत्नीचा छळ! पतीच्या अपिलावर जिल्हा सत्र न्यायालयाकडून शिक्षा कायम…

हुंड्यासाठी पत्नीचा छळ केल्याप्रकरणी पती निलेश कृष्णा फल्ले (रा. भिंगार) यास एक वर्ष सक्त मजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा अहमदनगर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी ठोठावण्यात आली होती. आरोपी पती निलेश फल्ले यांने जिल्हा सत्र न्यायालयात या शिक्षेविरोधात अपिल केलं. मात्र, जिल्हा सत्र न्यायालयानेही शिक्षा कायम ठेवली आहे. या सुनावणीचं कामकाज विशेष सरकारी वकील मनिषा केळकेंद्रे-शिंदे यांनी काम पाहिलं आहे.

Irshalwadi Landslide : इर्शाळगडावर संचारबंदी! सलग चौथ्या दिवशीही सर्च ऑपरेशन सुरुच…

पती निलेश फल्ले याचा 11 मे 2013 रोजी विवाह झाला. त्यानंतर पती-पत्नीचे सुरुवातीचे काही दिवस चांगले गेले. त्यानंतर माझ्या आफिससाठी माहेरुन दीड लाख रुपये आण, अशी मागणी पतीकडून करण्यात आली. या कारणावरुन पत्नीचा छळ सुरु होता. पत्नीने माहेरुन पैसे आणावे म्हणून पत्नीला पतीने घरातून हाकलून दिले होते. त्यानंतर नातेवाईकांनी समजावून सांगितलं. अप्पर पोलीस अधीक्षक यांचे सांगण्यावरून पत्नी पुन्हा सासरी नांदायला गेली.

चीनमध्ये सेलिब्रिटी-राजकारणी का होतात बेपत्ता? ‘जॅक मा’नंतर परराष्ट्र मंत्रीही गायब

त्यानंतर पती निलेश फल्ले याने पुन्हा पत्नीला हुंड्यासाठी त्रास देण्यास सुरूवात केली. निलेश याने 9 मे 2013 रोजी दोन लाख रुपये आणण्यासाठी पत्नीला मारहाण केली. त्यामुळे तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करावे लागले. तिने दिलेल्या फिर्यादीवरून पती निलेश फल्ले याच्याविरूध्द हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, या खटल्यात फिर्यादी, भाऊ, मामा आणि तपासी अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. या खटल्याचा निकाल 9 जानेवारी 2018 रोजी लागला. निलेश यास दोषी धरण्यात येऊन त्याला शिक्षा ठोठावली होती. त्याने या शिक्षेविरूध्द जिल्हा सत्र न्यायालयात अपिल केलं होते. न्यायालयाने अपिलात कनिष्ठ न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा कायम ठेवली आहे. या सुनावणीत अ‍ॅड. केळगंद्रे- शिंदे यांनी सरकारतर्फे काम पाहिले असून पैरवी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी त्यांना सहकार्य केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube