Irshalwadi Landslide : इर्शाळगडावर संचारबंदी! सलग चौथ्या दिवशीही सर्च ऑपरेशन सुरुच…
Irshalwadi Landslide : अतिवृष्टीमुळे डोंगर खचला आणि इर्शाळवाडी गावावर दुखा;चा डोंगरच कोसळला. अचानक डोंगराचा काही भाग खचल्याने इर्शाळवाडी (Irshalwadi Landslide) गावच मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलंय. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 106 नागरिकांना बाहरे काढण्यात यश आलं असून 27 मृतदेशांचा शोध घेण्यास एनडीआरएफच्या टीमला यश आलं आहे. दरम्यान, अद्यापही 78 नागरिकांच्या शोधात एनडीआरएफच्या टीमचं सर्च ऑपरेशन सुरुच आहे. याच पार्श्वभूमीवर इर्शाळवाडी गडावर कलम 144 लागू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे बाहेर काढलेल्या नागरिकांची मानसोपचार तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात येत आहे. त्यासाठी इर्शाळगडावर मानसोपचार तज्ज्ञांची टीम दाखल झाली आहे.
Irshalwadi landslide : झोपड्या तोडणारे वनविभागाच आता आरोपाच्या पिंजऱ्यात
मान्सून दाखल झाल्यानंतर चार दिवसांपूर्वी कोकण भागांत मुसळधार पाऊस बरसत आहे. रायगड जिल्ह्यातील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीत अचानक डोंगराचा काही भाग कोसळला. दुर्घटनेनंतर राज्यात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत अनेक नागरिक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याने एनडीआरएफच्या टीमकडून युद्धपातळीवर नागरिकांचा सर्च ऑपरेशन सुरु आहे.
पुण्यातील प्रसिध्द हिल स्टेशन लवासा विकले, तब्बल 1800 कोटींना विक्री
दरड कोसळल्याची दुर्घटना घडल्यानंतर तत्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इर्शाळवाडीमध्ये दाखल होतं, बचावकार्यामध्ये भाग घेत दुर्घटनाग्रस्त नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. या दुर्घनटनेत मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदतही शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे.
Pankaja Munde : ‘पंकजांना भाजपमध्ये जास्त त्रास झाला तर’… भाऊ जानकरांचा निर्वाणीचा इशारा
दरम्यान, या भागांत सतत पाऊस पडत आहे, हवामान खराब आहे, मातीच्या पायवाटा असल्याने प्रचंड चिखल झाला आहे. या अडचणींवर मात करीत बचावकार्य सुरू होते. पण, काल हवामान अधिकच खराब झाल्याने बचावकार्य थांबवण्यात आले होते.
आता पुन्हा सकाळीच लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. एनडीआरएफची टीम आता इर्शाळगडावर रवाना झाली असून हवामानाच्या बदलामुळे सर्च ऑपरेशनमध्ये अनेक अडचणी येत आहेत.