Irshalwadi landslide : झोपड्या तोडणारे वनविभागाच आता आरोपाच्या पिंजऱ्यात

  • Written By: Published:
Irshalwadi landslide : झोपड्या तोडणारे वनविभागाच आता आरोपाच्या पिंजऱ्यात

Raigad Irshalwadi landslide : रायगडमधील इर्शाळवाडीवर दरड कोसळून आतापर्यंत सोळा जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरानंतर बचावकार्य थांबविण्यात आले आहे. या दुर्घटनेमध्ये आणखी लोक अडकलेले आहेत. त्यामुळे मृताचा आकडा वाढणार आहे. इर्शाळवाडीला मंत्री, राजकीय नेते भेट देत आहे. या दुर्घटनेनंतर आता वनविभागावर आरोप होऊ लागले आहेत. या दुर्घटनेत बचावलेल्या लोकांनी वनविभागावर आरोप सुरू केले आहेत. त्यात आता राजकीय नेते वनविभागावर बोलू लागले आहेत. त्यामुळे आता वनविभागाचे अधिकारी आरोपाच्या पिंजऱ्यात सापडू लागले आहे. (Irshalwadi landslide forest department cage of accusation)

इर्शाळवाडीतील भीषण दुर्घटना का घडली? कारणं देत माधव गाडगीळांचे सरकारवर ताशेरे

दरड कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची भिती होती. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी आपले राहते घर सोडून जवळच असलेल्या एका जंगलामध्ये झोपड्या करून राहू लागले. परंतु वनविभागाने त्यांना तेथे राहण्यास मज्जाव केला. त्यांच्या झोपड्या मोडल्या आणि त्यांना जंगलातून हाकलून लावले. हा प्रकार वनविभागाने एकदा नाही तर अनेक वेळा केला, असा आरोपही आता नागरिक करू लागले आहेत.

Irshalwadi Landslide : ग्रामस्थांच्या तात्पुरत्या पुनर्वसनासाठी पायथ्याशी 50 कंटेनर; मुख्यमंत्र्यांची घोषणा

या घटनेला वनविभाग जबाबदार आहे असा आरोप तेथील ग्रामस्थ करत आहेत. तसेच हे ग्रामस्थ वनविभागावर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आता याप्रकरणात उडी घेतली आहे. गावकऱ्यांच्या झोपड्या तोडणाऱ्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. त्यांना निलंबित करून चौकशी करून मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविले पाहिजे, अशी मागणी बाळा नांदगावकर यांनी केली आहे.

राज्यात धोकादायक असलेल्या भागाचा सरकारने आराखडा तयार केला पाहिजे. आराखडा तयार करून डोंगरदऱ्यात वसलेल्या धोकादायक वस्त्या हलविल्या पाहिजे. या गावांना पठार भागावर घरे बांधून दिली पाहिजे, अशी मागणी बाळा नांदगावकर यांनी केली आहे. येथील ग्रामस्थांनीही वनविभागावर कारवाई करण्याची मागणी केली आहेत. त्यात आता राजकीय नेतेही मागणी करून लागले आहेत. त्यामुळे सरकारला या विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश द्यावे लागणार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube