Irshalwadi Landslide : ग्रामस्थांच्या तात्पुरत्या पुनर्वसनासाठी पायथ्याशी 50 कंटेनर; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Irshalwadi Landslide : ग्रामस्थांच्या तात्पुरत्या पुनर्वसनासाठी पायथ्याशी 50 कंटेनर; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Raigad Khalapur Irshalwadi Landslide : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी या गावात रात्री लोकं झोपेत असतानाच काळाने हा घाला घातला. पावसात अख्ख्या गावावरच मोठी दरड कोसळली. आता दिवस उजाडल्यावर या भयानक घटनेचं मन विषण्ण करणारं खरं रुप समोर आलं आहे. या गावावर दरड कोसळल्याच्या घटनेत आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 80 हून अधिक जणांना सुखरुपरित्या बाहेर काढण्यात यश आलं आहे. त्यानंतर या दुर्घटना स्थळाला मंत्र्यांसह मुख्यमंत्री शिंदेंनी भेट दिली. त्यांनी या ग्रामस्थांचं कायमस्वरूपी पुनर्वसन करणार तसेच त्यांच्यासाठी पायथ्याशी तात्पुरती 50 कंटेनरची व्यवस्था करणार असल्याचं अश्वासन दिलं आहे. ( CM Eknath Shinde announce for Permanent Resettlement of Villagers Irshalwadi Landslide )

पंतप्रधानांनी निषेधच नाहीतर कृती करावी, मणिपूर हिंसाचारावर राज ठाकरे संतापले…

मुख्यमंत्री कार्यालायाच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून ट्विट करत या ग्रामस्थांना मदत करणार असल्याचं जाहिर केलं आहे. या ट्विटमध्ये काय म्हटलं पाहूयात…’इर्शाळवाडी या दुर्घटनाग्रस्त गावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. तेथील परिस्थितीचा आणि सुरू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला. या घटनेत 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली.

सांगोल्यातील देशमुखांची भाऊबंदकी मिटली, पण फडणवीसांच्या एन्ट्रीने संभ्रम वाढला!

दरम्यान काही ग्रामस्थ भातशेतीच्या कामासाठी इतरत्र गेले असून काही विद्यार्थी आश्रमशाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यांचाही शोध घेतला जात आहे. या ग्रामस्थांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यासाठी पायथ्याशी 50 कंटेनरची व्यवस्था करण्यात येत असून या ग्रामस्थांचे कायमस्वरूपी पुनर्वसन देखील करण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, स्थनिक आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते.’ अशी माहिती देण्यात आली आहे.

इर्शाळवाडीत नेमकं काय घडलं ?
महिला म्हणाली, ‘बुधवारी रात्री मोठा पाऊस सुरू होता. वाराही सुटला होता. आम्ही घरातच होतो. अचानक बाहेर काहीतरी मोठा आवाज झाला. आम्हाला वाटलं की एखादं घरच पडलं आहे. पण, बाहेर येऊन पाहिलं तर अख्खं गावच ढिगाऱ्याखाली दबलं गेलं होतं. आमच्या शेजारील काही घरेही दबली गेली होती. त्यानंतर आम्ही आरडाओरडा करू लागलो. घरातील सदस्यांना घेऊन पटकन बाहेर पडलो.’

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube