पंतप्रधानांनी निषेधच नाहीतर कृती करावी, मणिपूर हिंसाचारावर राज ठाकरे संतापले…

पंतप्रधानांनी निषेधच नाहीतर कृती करावी, मणिपूर हिंसाचारावर राज ठाकरे संतापले…

Manipur Violence : देशभरात मणिपूर हिंसाचार आणि महिलांच्या व्हायरल व्हिडिओवरुन सर्वच स्तरातील नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनीही घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी फक्त निषेधच नाहीतर कृती करावी, अन्यथा ईशान्य भारत कायमचा भारतापासून तूटणार असल्याचं भाकीत केलं आहे. यासंदर्भात राज ठाकरेंनी ट्विट केलं आहे.

राज ठाकरे ट्विटमध्ये म्हणाले, मणिपूरची घटना हादरवणारी असून केंद्र आणि राज्य सरकारला लाज वाटायला लावणार आहे. मणिपूर हिंसाचाराप्रकरणात लक्ष घालून प्रश्न मार्गी लावण्याबाबतची मागणी केली होती, पण मणिपूरची परिस्थिती ‘जैसे थे’ असून हेच दुर्देव असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

शरद पवारांना राष्ट्रीय पातळीवर मोठा धक्का! नागालँडमधील सर्व आमदारांचा अजितदादांना पाठिंबा

या प्रकरणात जर केंद्राकडून ठोस कारवाई होणार नसेल तर राष्ट्रपती महोदयांनी लक्ष घालाव, असंही ते म्हणाले आहेत. तसेच मणिपूरमध्ये गेल्या ३ महिन्यात जे घडलं त्याने फक्त मणिपूरच नाही तर संपूर्ण भारताच्या समाजमनावर ओरखडा उमटला आहे आणि यातून काही वर्षांनी एखादं आक्रीत घडलं तर त्याला मात्र सध्याचंच सरकार जबाबदार असेल, जे गुन्हेगार आहेत त्यांना फाशीच झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. मणिपूरच्या घटनेमध्ये पंतप्रधानांनी आत्ता जरी या घटनेचा निषेध केला असला तरी तो पुरेसा नाही, आता कृती करा, अन्यथा ईशान्य भारत कायमचा भारतापासून तुटेल, असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, मणिपूर हिंसाचार आणि महिलांच्या व्हिडिओ प्रकरणावरुन संसदेच्या दोन्ही सभआगृहात विरोधकांकडून गदारोळ घालण्यात आला. विरोधकांच्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं आहे. महिलांच्या व्हिडिओप्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून घेण्यात आली असून या प्रकरणातल्या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून इतर आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार आहे. सोशल मीडियावरुन व्हिडिओवर बंदी घालण्याचे निर्देश महिला आयोगाकडून देण्यात आले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube