Download App

मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेसचा अहमदनगरमध्ये होणारा वर्धापन दिन रद्द : अजित पवार यांची घोषणा

Ajit Pawar :

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) 9 जूनला अहमदनगरमधील (Ahmednagar) केडगांव येथे होणारा रौप्य मोहत्सवी वर्धापन दिनचा कार्यक्रम आणि सभा रद्द करण्यात आली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. हवामान खातं आणि वेधशाळेच्या अंदाजानुसार पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्याचं चक्री वादळात निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यात मुसळधार पावासाचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे पवार यांनी सांगितलं. (NCP Leader Ajit Pawar announced Nationalist Congress Party (NCP) has canceled its silver anniversary program and meeting to be held at Kedgaon in Ahmednagar)

अजित पवार म्हणाले, आमची जिथं सभा होणार होती तिथं काल पाऊस पडला आणि काळवट जमीन असल्यामुळे बाकीचे काम थांबले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सामान्य नागरिक आणि प्रशासनाची गैरसोय होऊ नये म्हणून आणि वेधशाळेत सतर्कतेचा इशाराच दिलेला असल्यामुळे वर्धापनदिनाची सभा आणि कार्यक्रम पुढे ढकललेला आहे.

Pawar Vs Tumane : तुमानेंच्या आरोपांवर अजितदादांचा चढला पारा; थेट खासदारकीला दिलं आव्हान!

अहमदनगर, नाशिक, बीड आणि पुणे या जवळच्या जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातल्या पण इतर भागातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर येणार होते. पण त्यांना सगळ्यांना सांगायचे की आपल्याला आता तिथं जायचं नाही. हा कार्यक्रम पुढे ढकलण्यासाठी पवार साहेबांशी चर्चा झाली आहे. तसंच जयंत पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल या सर्व नेत्यांनी चर्चा झाली आहे, अशीही माहिती पवारांनी दिली.

तयारी आली होती अंतिम टप्प्यात :

दरम्यान या कार्यक्रमासाठी रेल्वे स्टेशनच्या परिसरात केडगावमध्ये असलेल्या एका खुल्या मैदानावर या नियोजित कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निश्चित झाले होते. कार्यक्रमाची जबाबदारी पक्षाच्या स्थानिक लोकप्रतिनिधींवर देखील असल्याने आमदार संग्राम जगताप यांनी खुद्द सोमवारी या मैदानाची पाहणी केली. या ठिकाणी मैदानाची साफसफाई देखील पूर्ण झाली होती. तसेच कार्यक्रमाच्या दृष्टीने कामकाज देखील वेगाने सुरु होते.

Pawar Vs Tumane : तुमानेंच्या आरोपांवर अजितदादांचा चढला पारा; थेट खासदारकीला दिलं आव्हान!

मात्र, बदलते हवामान व यातच नव्याने हाती आलेला हवामान विभागाचा अंदाज यामुळे या वर्धापन दिनावरच संकट कोसळले. मान्सूनचा कल पाहता हा मेळावा पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. तसेच राष्ट्रवादीचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी देखील ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली. दरम्यान, मेळावा रद्द करण्यात आला नसून तो केवळ पुढे ढकलण्यात आला आहे. असे सांगण्यात आले असले तरी पक्षाकडून अद्याप आगामी तारीख जाहीर करण्यात आलेली नाही आहे.

Tags

follow us