Santosh Deshmukh murder case SIT : संतोष देशमुख यांचा खंडणी प्रकरणातून निर्माण झालेल्य वादातून निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या हत्याप्रकरणामुळे राज्यभरातील वातावरण प्रचंड तापल्यानंतर महायुती सरकारने संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास करण्यासाठी 10 जणांचे विशेष तपास पथक (एसआयटी) तयार केले होते. (Santosh Deshmukh ) मात्र, या एसआयटीमधील पोलिसांच्या विश्वासर्हतेवरच शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यात एसआयटी पथकाचे प्रमुख IPS डॉ. बसवराज तेली यांचा अपवाद वगळता इतर सर्व पोलीस अधिकारी हे वाल्मिक कराडचे पोलीस आहे, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटच्या माध्यमातून केला.
धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक, अवादा कंपनीकडे मागितली 3 कोटींची खंडणी; सुरेश धस यांचे गंभीर आरोप
API महेश विघ्नेसह दोघांची उचलबांगडी
या दाव्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले असल्याचे बघायला मिळाले आहे. कारण वाल्मिक कराड सोबत फोटो काढणे पोलीस अधिकार्यांना अंगलट आले आहे. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अक्षेपानंतर एपीआय महेश विघ्ने यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. एपीआय महेश विघ्ने यांच्यासह इतर दोघांना एसआयटीतून बाजूला करण्यात आले आहे. संतोष देशमुख प्रकरणातील सूत्रधार असल्याचा आरोप होत असलेल्या वाल्मिक कराड सोबत महेश विघ्ने यांचा फोटो वायरल झाला होता. त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी महेश विघ्ने यांच्या बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
SIT मध्ये नको
हे तिन्ही कर्मचारी बीड स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी आहेत. एसआयटी मध्ये यांचा समावेश झाल्यानंतर सुद्धा बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना रिलीव्ह केलेले नव्हते. याचाच अर्थ हे तिघेजण आता एसआयटीचा भाग असणार नाहीत. दुसरीकडे याच मुद्यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी आरोपीच्या कोणी जवळचा SIT मध्ये असेल तर त्याला तत्काळ दूर करा, अशी मागणी केली होती. या प्रकरणात कोणी राजकारण करू नका, त्यांना विनंती आहे आपली भूमिका हीच असली पाहिजे की त्यांना न्याय मिळायला हवा, राजकारण करू नका असे आवाहनही त्यांनी यावेळी केलं होते.