Mahatma Phule Jan Aarogya Yojana : महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये सर्वसामान्यांना माफक दरामध्ये उपचार केले जातात. मात्र यामध्ये काही आजारांचा अद्याप समावेश केला गेला नव्हता. मात्र आता सर्वसामान्यांना दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्पदंश आणि अपेंडिक्स या आजारांचा देखील उपचार केला जाणार आहे. ( Appendix and Sneak bite disease include in Mahatma Phule Jan Aarogya Yojana said Health Minister Tanaji Savant)
पवारांनंतर आता आमदार काळेंही उद्योगमंत्र्यांच्या भेटीला, एमआयडीसीची केली मागणी…
सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी याबाबत महत्त्वाची घोषणा केली. दीपक चव्हाण यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत आजारांची संख्या वाढविण्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत सर्पदंश आणि अपेंडिक्स या आजारांचा समावेश करण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेत दिली.
ईडीचे प्रमुख संजय कुमार मिश्रा यांना 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ…
काय म्हणाले सांवत?
सावंत म्हणाले, राज्य शासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजना सार्वत्रिक केली आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्रात 5 लाखांपर्यंत मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या योजनेअंतर्गत सध्या 996 आजारांचा समावेश असून त्याची संख्या 1 हजार 356 केली जाणार आहे. तसेच या योजनेत समावेश करावयाच्या आजारांच्या निवडीसाठी एक विशेष समिती गठीत करण्यात येईल असेही मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले.