ईडीचे प्रमुख संजय कुमार मिश्रा यांना 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ…

Sanjay Kumar Mishra : सर्वोच्च न्यायालयाने ईडीचे प्रमुख संजय कुमार मिश्रा यांची मुदतवाढ बेकायदेशीर ठरवल्यानंतर आता मिश्रा यांना 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. संजय कुमार मिश्रा यांना सर्वोच्च न्यायालयाने 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यास परवानगी दिलीयं. मिश्रा यांना ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केंद्र सरकारकडून करण्यात आली होती. फायनान्शियल अॅक्शन टाक्स फोर्सच्या पुनरावलोकनासाठी मिश्रा यांची उपस्थिती देशाच्या हिताचं असल्याचं स्पष्टीकरण केंद्र सरकारकडून न्यायालयात देण्यात आलं आहे.
संजय कुमार मिश्रा यांच्या मुदतवाढीसंदर्भातील केंद्र सरकारचा अर्ज देशाच्या हितासाठी विचारात घेण्यात आला आहे. 11 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने संजय मिश्रा यांची मुदतवाढ बेकायदेशीर असल्याचं स्पष्ट केलं होतं. तसेच 31 जुलैपर्यंत त्यांना पदावर राहण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात परवानगी देण्यात आली होती.
केजरीवाल यांना मोठा धक्का! विरोधकांचा डाव उधळण्यासाठी PM मोदींच्या मदतीला धावला युवानेता
केंद्र सरकारने दाखल केलेल्या अर्जात म्हटलं की, FATF चं पुनरावलोकन सध्या अंतिम टप्प्यावर आहे. त्यामुळे मिश्रा यांच्यासारख्या व्यक्तींच्या नेतृत्वाखाली पुनरावलोकन करणं गरजेचं आहे. कारण त्यांना देशभरातील मनी लॉन्ड्रिंग तपास आणि कारवाईची माहिती असल्याचं केंद्राकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे मिश्रा यांना मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी केंद्राकडून करण्यात आली होती.
दरम्यान, ईडीचे प्रमुख संजय कुमार मिश्रा यांना तिसऱ्यांचा मुदतवाढ देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. ईडी प्रमुखांना तिसऱ्यांदा मुदतवाढ देणे योग्य नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणात ईडीच्या संचालकांच्या सेवेला तिसऱ्यांदा मुदतवाढ देणे बेकायदेशीर आहे. तसेच कायद्याने देखील अमान्य आहे. ईडीचे संचालक संजय कुमार मिश्रा 31 जुलै पर्यंत आपल्या पदावर कायम राहतील, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं होतं. यानंतर आता देशहितासाठी संजय कुमार मिश्रा यांना 15 दिवसांची मुदवाढ देण्यात आली आहे.