Arabian Sea : महाराष्ट्र आणि गोव्या जवळ अरबी समुद्रात (Arabian Sea) 21 मेपासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 24 मेपर्यंत तो अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकू शकतो. राज्याच्या किनाऱ्याला थेट धोका नसला तरी याचा परिणाम म्हणून समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे 22 ते 24 मे दरम्यान रायगड (Raigad) , रत्नागिरी (Ratnagiri), मुंबई (Mumbai) आणि पालघरजवळ (Palghar) समुद्र खवळू शकतो, तर खोल समुद्रात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
त्यामुळे मासेमाऱ्यांनी हवामान बदलांवर लक्ष ठेवून या काळात खोल समुद्रात जाणे टाळावे, असा इशारा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापनाकडून 21 ते 24 मे दरम्यान मच्छीमारांसाठी काही सूचना देखील देण्यात आले आहे.
21 ते 24 मे दरम्यान मच्छीमारांनी घ्यावयाची सावधगिरी
– हवामान खात्याच्या अपडेट्स नियमितपणे तपासत राहावेत.
-स्थानिक प्रशासन व मच्छीमार सहकारी संस्थांकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करावे.
-खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणे पूर्णतः टाळावे.
-लहान बोटींचा वापर टाळावा, किनाऱ्यालगतच कार्य करावे.
-सुरक्षेसाठी आवश्यक ती साधने (लाईफ जॅकेट्स, वायरलेस सेट) जवळ बाळगावीत.
-संभाव्य वाऱ्याचा वेग व लाटांचा जोर लक्षात घेऊन किनाऱ्यावरील होड्या व बोटी सुरक्षित स्थळी हलवाव्यात.
– समुद्र खवळलेला असताना मासेमारी टाळून स्वतःची व इतरांची सुरक्षितता जपावी.
तर दुसरीकडे मंगळवारी (20 मे) रोजी पुणेसह, मुंबई, अहिल्यानगर येथे अवकाळी पाऊस झाल्याने अनेकांचे हाल झाले आहे. पुण्यातील विमानतळ परिसर, सिंहगड रोडवर अवकाळी पावसामुळे ट्राफिक पाहायला मिळाली तर दुसरीकडे अहिल्यानगरच्या अनेक तालुक्यांसह शहरात देखील विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली.
सरकारची सुपरहिट योजना, जमा करा फक्त 376 रुपये अन् मिळवा दरमहा 5 हजार
मुंबईतील उपनगराच्या वेगवेगळ्या भागात मान्सूनपूर्व पाऊस विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस बरसला. अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली. विविध भागांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या. दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव आणि अंधेरी भागात पावसाने हजेरी लावली.