Download App

Asaduddin Owaisi : ‘एक है तो सेफ है’ वरून राजकारण पेटलं; ओवैसींचा थेट मोदींवर हल्लाबोल

ओवेसी म्हणाले, की एक है तो सेफ है या नावाखाली पंतप्रधान मोदी हे दोन समाजांना आपापसात लढविण्याचा प्रयत्न करु पाहत आहेत.

  • Written By: Last Updated:

Maharashtra Vidhansabha Election 2024  : छत्रपती संभाजीनगर: राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. सर्वच पक्षाच्या स्टार प्रचारकांसह प्रमुख नेत्यांच्या सभांचा धडाका सुरु आहे. ऑल-इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम )चे पक्षाचे राष्ट्रीय नेते खासदार असदउद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Owaisi) यांच्यावर मराठा आणि ओबीसीत वाद निर्माण करण्याचा आरोप केला आहे. ते छत्रपती संभाजीनगरमधील प्रचारसभेत बोलत होते. ओवेसी म्हणाले, की एक है तो सेफ है या नावाखाली पंतप्रधान मोदी हे दोन समाजांना आपापसात लढविण्याचा प्रयत्न करु पाहत आहेत.

Video: धनंज महाडिकांची महिलांना भरसभेत धमकी; सतेज पाटलांकडून कोल्हापूरी स्टाईल  समाचार

फडणवीसांची ओवैसींवर टीका

‘महायुतीच्या सरकारने संभाजी महाराज यांचं नाव या शहराला दिले. आता आम्ही जागे झालो आहोत. आता व्होट जिहाद सुरु झालाय. लोकसभेच्या निवडणुकीत हे पाहायला मिळालं. योगींनी आपल्याला सांगितले बटेंग तो कटेंगे. मोदींनी ही सांगितलं की एक रहेंगे तो सेफ रहेंगे. आता भगव्याचा एकत्रित हुंकार या ठिकाणी दिसला पाहिजे. संभाजीनगर २३ तारखेला देखील भगवाच असेल हे दाखवून देण्याची ही निवडणूक आहे. काही लोकांनी भगव्यासोबत गद्दारी सुरु केली. बाळासाहेब ठाकरे यांनी या शहराला संभाजीनगर नाव दिलं. पण अलीकडच्या काळात काही नेत्यांना हिंदूहृदयसम्राट म्हणायला लाज वाटते. ही निवडणूक एकजूट दाखवण्याची निवडणूक आहे. असं ही फडणवीस म्हणाले.

follow us