मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पुरानं शेतकरी हैराण असतानाच (Owaisi) कोल्हापूर, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरच्या करमाडमध्ये निर्माण झालेल्या वादानंतर असदुद्दीन ओवेसी यांनी कोल्हापूरचा दौरा केला. आज त्यांची अहिल्यानगर जिल्ह्यात जाहीर सभा आहे. त्यापुर्वी त्यांनी पुण्यात पत्रकार परिषदेला संबोधित केलं.
यावेळी बोलताना ते म्हणाले की एक लक्षात घ्या की कायम मुस्लिमांना संख्येवरून बोललं जात. पण, मी एक गोष्ट सागंतो हिंदुंच्या संख्येपेक्षा मुस्लिम संख्या भारतात कधीच जास्त होऊ शकत नाही. पण, लोक गोष्ट लक्षात न घेता कायम आमच्यावर टीका करत राहतात असंही ते यावेळी म्हणाले. त्याचबरोबर मुस्लिमांमध्ये काही चुकीच्या गोष्टी नक्की आहेत. परंतु, ते लोकसंख्येमुळे मागं राहिले असं म्हणणं हे अत्यंत चुकीच आहे असंही ते यावेळी म्हणाले.
असुद्दीन ओवेसींची आहिल्यानगरमध्ये सभा, जाणून घ्या काय आहेत अटी शर्ती ?
आम्ही कधीही मंत्री होण्यासाठी आणि सत्तेत येण्यासाठी राजकारण केलं नाही आणि करणार नाही. आमचं राजकारण हे कायम ज्यांना अधिकारांपासून दूर ठेवलं गेलं आहे त्यांच्यासाठी होत आणि असणार आहे. तसंच, आजही अनेक लोकांना चेहरा मिळाला नाही त्यांना चेहरा देण ही आमची जबाबदारी आम्ही समजतो. तसंच, अनेक ठिकाणी मुस्लिम लोकांना डावललं जात त्या लोकांना आधार देण्यासाठी आमचं राजकारण आहे असंही ते म्हणाले. कित्येक शहरात मुस्लिम लोकांना घर मिळत नाही, त्यांना वेगळ समजलं जात हेही आमच्यापुढच्या समस्या आहेत असंही ते म्हणाले.
मराठवाड्यात आम्ही जी लोक पूरग्रस्त आहेत. त्यांना आम्ही मदत करत आहोत. इथ कोणी मुस्लिम, हिंदू, शिख, ख्रिश्चन नाही. सर्व अडचणीत आहेत. त्यामुळे आम्ही सर्व ठिकाणी मदत करतो असं म्हणत ओवेसी म्हणाले 56 इंच छाती असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत आरामात बसले आहेत. ते का मराठवाड्यासाठी पैसे देत नाहीत? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी थेट केंद्र सरकारवर घणाघात केला आहे.