Download App

Ashadhi Vari : पंढरपुरातील झापाझापीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांचा महत्त्वाचा निर्णय…

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या पूर्व तयारीच्या आढाव्यादरम्यान कामांमध्ये त्रुटी आढळून आल्या होत्या. त्यावरुन मुख्यमंत्र्यांनी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यासंह इतर अधिकाऱ्यांना झापलं होतं. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये, म्हणून दोन मंत्र्यांवर समन्वयकाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

‘त्यावेळी ते प्राथमिक शाळेत असतील’; पवारांनी उडवली फडणवीसांच्या वक्तव्याची खिल्ली

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. आषाढी वारीसाठी पंढरपुरच्या विठुरायाच्या दर्शनाला लाखो वारकरी येत असतात. आषाढीच्या दिवशी पंढरपुरात दर्शनासाठी भाविक भक्तांची मोठी गर्दी होत असते.

Parineeti Raghav केव्हा लग्न करणार? पापाराझींच्या प्रश्नाला अभिनेत्रीचा भन्नाट रिएक्शन; Video Viral

आषाढी वारीसाठी राज्यातून येणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी रस्ते, पाणी, स्वच्छता आणि इतर सोयी सुविधा, पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यांना कोणताही त्रास झाला नाही पाहिजे, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा बैठकीनंतर दिले होते. त्यानंतर आता या सर्व गोष्टींसाठी दोन समन्वयकांची नेमणूक मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे.

विठूरायाच्या दर्शनापूर्वी केसीआर यांचा मटणावर ताव! धाराशीवमध्ये बीआरएसच्या ताफ्याला ‘बोकड पार्टी’

आषाढी वारीत कोणत्याही वारकऱ्याला त्रासाला सामोर जावं लागू नये, म्हणून शिंदे सरकार पुढे सरसावलं आहे. पंढरपुरातील तीन ठिकाणी आरोग्याची वारी उपक्रमांतर्गत वारकऱ्यांसाठी मोफत महाआरोग्य शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.

दरम्यान, आषाढी वारीसाठी वारकऱ्यांना औषधांचा पुरेसा साठा, पिण्याच्या पाण्याचे टँकर, पाण्याच्या स्रोतांची, पाण्याची वेळोवेळी तपासणी, रुग्णवाहिका, आरोग्य पथके, यंत्रणा सज्ज ठेवण्याबाबतचे निर्देश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत.

Tags

follow us