Parineeti Raghav केव्हा लग्न करणार? पापाराझींच्या प्रश्नाला अभिनेत्रीचा भन्नाट रिएक्शन; Video Viral
Parineeti Chopra: बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदित आदमी पार्टीची खासदार राघव चड्डा (Raghav Chadha) हे मागच्या काही दिवसांपासून सारखेच चर्चेत आहेत. 13 मे 2023 रोजी या दोघांचा साखरपुडा दिल्लीत पार पडला. आता परिणीती आणि राघव लग्न बंधनात केव्हा अडकणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. दरम्यान, सध्या परिणीती चोप्राचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल (Video Viral ) होत आहे.
View this post on Instagram
परिणीती चोप्राने नुकतीच एका अवॉर्ड शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी पापाराझिंनी परिणीतीला अनेक प्रश्न विचारले. “लग्नानंतर तुझे आयुष्य कसे सुरू आहे?” असा प्रश्न विचारल्यानंतर परिणीतीने उत्तर दिले, “आमचे अजून लग्न झालेले नाही”… पापाराझिंनी पुढचा प्रश्न विचारला, “मग केव्हा करणार लग्न?” यावर परिणीतीने कोणतेही उत्तर दिले नाही.
काही रिपोर्टनुसार परिणीती चोप्रा आणि राघव चड्डा हे दोघेही याच वर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात उदयपूर मधील उदय विलास पॅलेस मध्ये लग्न करणार असल्याची माहिती आहे. मात्र याबद्दल अद्यापही अधिकृतपणे या दोघांकडून स्पष्ट करण्यात आलेलं नाही. परिणीती चोप्रा आणि राघव चड्डा यांच्या लग्नाची त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
Raja Karale Passes Away : ‘भैरू पैलवान की जय’ फेम दिग्दर्शक प्रवीण कारळे यांचं निधन
मात्र यांच्या लग्नाची तारीख अजूनही या जोडप्याने जाहीर केलेली नाही. 13 मे 2023 रोजी परिणीती आणि राघवचा साखरपुडा दिल्लीतील कपूरथला हाऊस मध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला होता. या साखरपुडा सोहळ्यात राजकारणातील बड्या नेत्यांनी ही हजेरी लावली होती. परिणीती आणि राघव बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते.
परिणीतीच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर यापूर्वी तिचा ‘उंचाई’ हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता. सध्या ती इम्तियाज अलीच्या आगामी ‘चमकीला’ चित्रपटात पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझबरोबर पडद्यावर दिसणार आहे.